सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या(Gold-Silver Price) दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी आताच तयार व्हा. जळगावच्या सराफ बाजारत सोनं-चांदीच्या दरात तब्बल ३ हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी स्वस्त झाली आहे. यामुळे लग्नसराईसाठी सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या सराफ बाजारात सोनं- चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जळगावात गेल्या तीन दिवसांत सोन्याचे दर हे ३ हजार ११३ रूपयांनी घसरले आहेत. तर चांदीचे दर हे तब्बल १२ हजार ३६० रुपयांनी कमी झाले आहेत. तीन दिवसांपूर्वी सोन्याचे जीएसटीसह दर ९४ हजार ८६३ रुपये तर चांदीचे दर १ लाख ५ हजार ६० रुपये होते.
जळगावच्या सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे आजचे सोन्याचे जीएसटीसहचे दर ९१ हजार ६७० रुपये एक तोळ्यावर आले आहे. तर चांदीचे दर ९२ हजार ७०० रुपये प्रति किलोवर आले आहेत. त्यामुळे लग्नसराईसाठी सोनं-चांदी खरेदी करण्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यात विक्रमी उच्चांकी वर पोहोचलेल्या सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोनं- चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे जळगावची सुवर्णनगरी अनेक दिवसानंतर ग्राहकांनी गजबजल्याचे पाहायला मिळत आहे.