संत भिमा भोई यांचा मानवतावादी विचार समाजात रुजवणे काळाची गरज – संतोष आंबेकर
हिमायतनगर दि.२८: तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे मानवतावादी संत भिमा भोई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील सर्व अठरा पगड जाती समुहातील तरूण युवकांनी एकत्र येऊन या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्व बहुजन महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
समाजात अमानवी मुल्य झपाट्याने पसरत असल्याने समाजात प्रचंड स्वैराचार वाढला आहे.त्यामुळे समाजात वावरणाऱ्या माणसाला सुरक्षित करण्यासाठी संत भिमा भोई यांचा मानवतावादी विचार समाजात रूजवणे काळाची गरज आहे. असे मत मंगरूळ नगरीचे उपसरपंच तथा कॉंग्रेस पक्ष अनुसूचित जाती विभागाचे, तालुकाध्यक्ष श्री.संतोष आंबेकर यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना व्यक्त केले.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक बालाजी पावडे (सरपंच प्रतिनिधी),सुभाष गुलजरवाड (तंटामुक्ती अध्यक्ष),पवन जयस्वाल (पोलिस पाटील),राम कुंजरवाड, गोपीनाथ कुंजरवाड,सचिन गुलजरवाड उपस्थित होते तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संत भिमा भोई सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते प्रकाश बोरकर,सचिन गोंडाडे, बाळु राकडे,माधव बावने, संतोष बोरकर, अंकुश शारे, विशाल बोरकर,दिगांबर बोरकर, विठ्ठल आगीरे,विकास बोरकर,नितेश बोरकर,माधव बावने, दिलीप बावने,अक्षय सातेगावकर,प्रसाद राकडे, अविनाश बोरकर, दत्ता बोरकर,गणेश बोरकर, विलास बोरकर, लताबाई बोरकर, पार्वतीबाई बोरकर,लक्ष्मण बोरकर,करण बोरकर,शैलेश बोरकर,आडेलु बोरकर आदींनी परिश्रम घेतले तसेच सर्व समाज घटकांतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.प्रकाश बोरकर यांनी केले
#सत्यप्रभा न्युज #नांदेड