नांदेड १२ डिसेंबर आर्वी पंचायत समितीतील मनरेगाच्या प्रकरणात गटविकास अधिकारी सौ. सुनीता मरसकोल्हे यांना झालेल्या कथित नियमबाह्य अटकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना, नांदेडने ४ व ५ डिसेंबर रोजी दोन दिवसांची सामूहिक रजा जाहीर केली आहे. या कालावधीत कुठलेही शासकीय काम न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संघटनेचे म्हणणे आहे की, प्राथमिक चौकशी न करता आणि महिला अधिकारी असल्याने आवश्यक प्रक्रिया न पाळता करण्यात आलेली ही कारवाई अन्याय्य आहे. तांत्रिक प्रणालीतील त्रुटींसाठी अधिकाऱ्यांना गुन्हेगार धरणे योग्य नसल्याचेही संघटनेने नमूद केले.
संघटनेने इशारा दिला आहे की, राज्याचे मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री व रोहयो मंत्री यांच्या बैठकीत समाधानकारक निर्णय न झाल्यास राज्यभर कामबंद आंदोलन छेडले जाईल. निवेदनावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोळोदे, प्रकल्प अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी आदी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!











