तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | आज नांदेड (Nanded News) येथे भारतीय जनता पार्टी नांदेडचे राज्यसभा खासदार डॉ अजित गोपछडे यांच्या संपर्क कार्यालय येथे दिपावली निमीत्त स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत व संघटन मंत्री संजय कौडगे तसेच उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख यांच्या उपस्थितीत काॅग्रेस पक्षाचे मागील निवडणुकीचे उमेदवार जे अल्पशा मताने पराभुत झालेले तथा पिंजारी समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष फारूक पिंजारी यांचा आज भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश झाला. (Hadgaon News)
त्यामुळै तालुक्यात काँग्रेस पक्षाला त्यांच्या जान्याने मोठी अडचण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तालुक्यात वेगळीच चर्चा चालू आहे . यावेळी आमदार भिमराव केराम , आमदार राजेश पवार ,माजी आमदार अमरभाऊ राजुरकर,उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख,दक्षीण जिल्हाध्यक्ष संकुतराव हंबर्डे,माजी महानगराध्यक्ष प्रविणभाऊ साले,चैतन्यबापु देशमुख,मान्यवर मंडळी व हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सुधाकर पाटील सोनारीकर,आशिष सकवान, हदगाव पश्चिम मंडळ अध्यक्ष सुर्यकांत हनवते शिरीष मनाठकर, राम सुर्यवंशी, सचीन सुर्यवंशी, साई बाभुळकर, वानखेडे बापु, डि बी पाटील, सुशील नावडे उपस्थित होते.