नांदेड दि.६ :नांदेड शहरातील ई-स्क्वेअर चित्रपटगृहात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी निलेश जळमकर दिग्दर्शित सत्यशोधक चित्रपट 5 जानेवारी रोजी पाहिला.त्यावेळी ज्योतिबा आणि सावित्री यांनी अनिष्टरूढी, प्रार्थना न जुमानता समाजाला योग्य दिशा देऊन शिक्षणाचा पाया रुजवला आणि हाच वारसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे चालवला असुन सत्यशोधक हा चित्रपट प्रत्येकांच्या हृदयाला स्पर्श करणारा चित्रपट असल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. फुलेंचा इतिहास पुन्हा उघडणारा सत्यशोधक हा चित्रपट निलेश जळमकर दिग्दर्शित असून यामध्ये क्रांतीज्योती सावित्री यांच्या भूमिका राजश्री देशपांडे आणि ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत संदीप कुलकर्णी असून या चित्रपटाचे हरी नरके यांनी मार्गदर्शन केल. सत्यशोक हा शिक्षणाला प्रेरणा देणारा चित्रपट बघण्यासाठी नांदेड शहरातील दिलीप चव्हाण, अनंत राऊत, नारायण शिंदे, विश्वधार देशमुख, पृथ्वीराज तौर, पी विठ्ठल, राजेंद्र गोणारकर, ्यंकटी पावडे, महेश मोरे, मनोज बोरगावकर, महेंद्र नाईक, शारदा कदम, शिवाजी अंबुलगेकर, विशाल पतंगे, मनोहर बसवंते, लक्ष्मण शिंदे, बालाजी कुंपलवार, शिवा कांबळे , गोविंद नांदेडे, मामा जाधव, महेश जोशी, अजय गव्हाणे, विजय भोसले या लेखकांसह यावेळी चित्रपटगृहात अमर राजूरकर मोहनअण्णा हंबर्डे, ओमप्रकाश पोकर्णा, मीनल खदगावकर, मंगाराणी अंबुलगेकर, शैलजा स्वामी, किशोर स्वामी, विजय चवनकर, हनुमंत बेटमोगरेकर, संतोष पांडागळे, विठ्ठल पावडे, रेखाताई पाटील, शशिकांत क्षीरसागर, लक्ष्मण जाधव, मारुती शंकरतीर्थे, वेंकटची राऊत यांच्यासह अनेक शेतकरी, लेखक आणि अधिकारी चित्रपट ग्रहात उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड