
हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील करोडो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान, माजी पंतप्रधान, कुशल प्रशासक, अद्भुत दूरदृष्टी आणि अमोघ वक्तृत्व असलेले भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांची आज दि 25 डिसेंबर रोजी 100 वी जयंती हिमायतनगर येथील संपर्क कार्यालयात साजरी करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीला सुद्धा व्यापक प्रमाणात सुरुवात करण्यात आली आहे….

या बाबत सविस्तर वृत्त असे की भारताचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज दि 25 डिसेंबर रोजी 100 व्या जयंतीचे औचित्य साधून हिमायतनगर शहरातील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील भाजपा संपर्क कार्यालयात आज सदस्य नोंदणी अभियान अधिक व्यापक करून येणाऱ्या काळात शहरातील नगरपंचायत व जिल्हा परिषद स्तरावर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आप आपल्या बूथ मध्ये जाऊन आप आपल्या वार्डासह गावात भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी मोहीम अधिक व्यापक करून विकसित भारत घडवण्यासाठी काम करावे असे उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गजानन चायल यांनी सांगितले त्यानंतर अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आजचा दिवस दरवर्षी ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा केला जातो याच दिवसाचे औचित्य साधून आज त्यांना शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे अटलजींचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा आजच्या राजकारणासाठी प्रेरणादायी आहे तीच ऊर्जा व प्रेरणा घेऊन हिमायतनगर विधानसभेमध्ये सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून भारतीय जनता पार्टीचे पक्ष संघटन वाढविण्यासाठी काम करावे असे सांगितले यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल, सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, उपाध्यक्ष रुपेश नाईक,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष फिदायद खान,शहर अध्यक्ष विपुल दंडेवाड,लक्ष्मण डांगे,कल्याणसिंह ठाकूर,दुर्गेश मंडोजवार ,परमेश्वर नागेवाड, नितीन भुसावळे, सुधाकर चिठ्ठेवार,विशाल शिंदे,प्रकाश सेवनकर,गजानन पिंपळे,ज्ञानेश्वर कोरडे, पोशट्टी जाधव,परमेश्वर सातव,मारोती मोरे सह युवा मोर्चा,सोशल मीडिया सह भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया ,युवा मोर्चा, किसान सेना, अल्पसंख्यांक आघाडी सह सर्व आघाड्याचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते