हिमायतनगर प्रतिनिधी | Satyaprabha News | हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भातील प्रतिक्षीत आरक्षण यादी अखेर आज जाहीर झाली असून, या घोषणेमुळे शहरातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. आज दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी हिमायतनगर तहसील कार्यालयात आरक्षणाचा अधिकृत कार्यक्रम पार पडला. यावेळी हदगावचे उपविभागीय अधिकारी कांबळे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी व तहसीलदार पल्लवी टेमकर, तसेच नागरिक, राजकीय प्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षण कार्यक्रमात प्रभाग क्रमांक १ ते १७ या सर्वांचा तपशील नागरिकांसमोर सादर करण्यात आला. विशेष बाब म्हणजे, या आरक्षण यादीनुसार काही मातब्बर उमेदवारांचे प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यामुळे त्यांच्या राजकीय आकांक्षांना मोठा धक्का बसला आहे. अनेक दिग्गजांनी मागील निवडणुकीत जोरदार प्रचार करत प्रभाव निर्माण केले होते. मात्र यंदा आरक्षण बदलांमुळे त्यांना प्रभाग बदलावा लागणार की थांबावं लागणार – हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
…हिमायतनगर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025…
प्रभाग क्र. 1 – ओपन – महिला
प्रभाग क्र. 2 – open – पुरुष
प्रभाग क्र. 3 – obc – महिला
प्रभाग क्र. 4 (अनुसूचित जमाती- महिला)
प्रभाग क्र 5 – open – महिला
प्रभाग क्र 6 – (obc) – महिला
प्रभाग क्र 7 – (SC,अनुसूचित जाती- महिला)
प्रभाग क्र. 8 – ओपन – पुरुष
प्रभाग क्र. 9 (obc) – महिला
प्रभाग क्र. 10 – open पुरुष
प्रभाग क्र. 11 (obc) – पुरुष
प्रभाग क्र. 12 -open – पुरुष
प्रभाग क्र. 13 – ओपन – पुरुष
प्रभाग क्र. 14 (obc) – पुरुष
प्रभाग क्र. 15 – open – महिला
प्रभाग क्र. 16 – open – महिला
प्रभाग क्र. 17 – ओपन – पुरुष