देशात नरेंद्र,महाराष्ट्र देवेंद्र व हिमायतनगरात राजेंद्र चा बोलबाला… भाजपाचा प्रचार शुभारंभ……
हिमायतनगर प्रतिनिधी | आगामी होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ आज दिनांक 22 नोव्हेंबर रोजी श्री परमेश्वर मंदिर येथून करण्यात आला या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी भाजपा नेते डॉ.अंकुश देवसरकर,गिरीश जाधव, डॉ. प्रसाद डोंगरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री परमेश्वर महाराजांची महापूजा व आरती करून अनेक मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून या नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शुभारंभ करण्यात आला प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या भाजपाच्या पदयात्रेला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला रॅलीच्या मार्गावर विविध मंदिरासह अनेक ठिकाणी श्रीफळ फोडण्यात आले जागोजागी भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांचे मतदारांनी स्वागत करून त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
या बाबत सविस्तर व्रत असे कि हिमायतनगर नगर पंचायत निवडणूक कार्यक्रमाचा आज दि 22 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदा सह सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलताना डॉ. वानखेडे यांनी असे सांगितले की आगामी होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणार आहे मला एन वेळी उमेदवारी मिळाल्यामुळे सर्वच्या सर्व जागी उमेदवार उभे करता आले नाही याची खंत आहे पण सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन जनसेवे सोबत आरोग्य सेवेत सुद्धा काम करत मी हिमायतनगर शहरात विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविणार आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपा नेते खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब हे या निवडणुकीत विशेष लक्ष देऊन हिमायतनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ते रोल मॉडेल ठरणार आहेत व हिमायतनगरच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट भारतीय जनता पार्टीकडे तयार आहे अनेक विकासाच्या मुद्द्यावर येथील नगरपंचायत निवडणूक लढविली जाणार आहे कुठल्याही जातीपातीचा मतभेद न करता ही निवडणूक लढवून आम्ही जिंकणार आहोत आम्हाला कुठल्याही विरोधकांचे आव्हान नाही असे सांगत डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांनी विकास कामाच्या आधारावर भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित डॉक्टर अंकुश देवकर गिरीश जाधव डॉक्टर प्रसाद डोंगरगावकर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल,शहराध्यक्ष विपुल दंडेवाड, शरद चायल, नागेश डूडूळे, परमेश्वर सातव, अनिल शामराव माने, पंकज मुधोळकर, आशिष सकवान, भारत डाके, रामेश्वर सूर्यवंशी, दुर्गेश मांडोजवार,सह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.