
हिमायतनगर प्रतिनिध/- हिंगोली लोकसभेची उमेदवारी महायुती कडुन खासदार हेमंतभाऊ पाटील यांना नुकतीच जाहिर झाल्याने भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित दादा गटाच्या महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र येत श्री परमेश्वर मंदिर देवस्थान समोर आज दि 29 मार्च रोजी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला
हिंगोली लोकसभेच्या जागेवर महायुती कडुन कोणाला उमेदवारी दिली जाईल यावर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उद्धान येत असतांनाच हि जागा भारतीय जनता पार्टीला कि शिवसेना शिंदे गटाला सुटेल हा संभ्रम जनतेत होता, अखेर दि. २८ मार्च रोज गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या नावाची हिंगोली लोकसभे करीता उमेदवारी जाहिर केल्याने, महायुतीतील प्रतिक्षेत असलेल्या जागेचा तीढा सुटला, त्यानंतर दि 29 मार्च रोजी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिरा समोर महायुतीचे कार्यकर्ते एकत्र येत फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्र. सत्यवृत्त ढोले,भारतीय जनता पार्टीचे जि. महामंत्री गजानन तुप्तेवार, भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल,विजय वळसे पाटील, जि. महामंत्री आशिष सकवान, उप. जि. प्र. राजु पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख गौरव सुर्यवंशी, महिला आघाडी उप.तालुका प्रमुख पुजा चव्हाण, महिला आघाडी श.प्र. रेणुकाताई साबळकर, शहर प्रमुख गजानन हरडफकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष अभिषेक लुटे, वसंतराव डवरे, बालाजी खोकले, रामदास भडंगे, शंकर वागतकर, भिमराव भिसे, , भाऊराव वानखेडे, सुनिल चव्हाण, गजानन गोपेवाड, संतोष साभळकर, शंकर भैरवाड, नागनाथ गुंडेवाड, परमेश्वर अग्रवाल, नृसिंग नाईक, संतोष शिरगिरे, दिलीप ढोणे, भाजपा शहर प्रमुख विपुल दंडेवाड, विधानसभा संघटक बालाजी राठोड, सितल सेवनकर, दुर्गेश मंडोजवार, कल्याण ठाकुर, परमेश्वर नागेवाड, गजानन पिंपळे, बालाजी मंडलवाड, प्रकाश सेवनकर, विशाल शिंदे, नागेश अंधारे. लक्ष्मण डांगे, मारोती मोरे, रूपेश भुसावळे, विनायक ढोणे, लक्ष्मण ढाणके, शुध्दोधन हनवते, दिनेश राठोड, अनिल माने, संतोष बनसोडे, शंकर चव्हाण, संतोष पाटील, यांचेसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.