
हिमायतनगर प्रतिनिधी/- अयोध्या नगरीत दि 22 जानेवारी रोजी प्रभू श्री रामासाठी बांधण्यात आलेल्या भव्य मंदिरात श्रीराम लला गर्भगृहात विराजमान झाले आहेत. हा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा अनुभवण्यासाठी हिमायतनगर (वाढोणा ) येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या कमिटीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह दर्शन भाविक भक्तांना घडून आणले होते मंदिराच्या सभागृहात मोठ्या स्क्रीनवर हा लाईव्ह दर्शन सोहळा दाखवीवण्यात आला असून, श्री परमेश्वराच्या साक्षीने वाढोण्यातील हजारो रामभक्तानी श्रीरामललाच्या आगमनाचा सोहळा.याची देही याची डोळा अनुभवला तद्नंतर प्रभू श्रीरामाची शहरातील विविध समाजातील अकरा जोडप्यांना महाआरती करण्याचा मान श्री परमेश्वर देवस्थान कमिटीने दिला त्यामुळे वंचित ,शोषित ,भटक्या जमातीतील घटकांना प्रभू श्रीरामाच्या आरतीचा बहुमान दिल्याबद्दल शहरात परमेश्वर मंदिर कमिटीच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे. त्या अगोदर शहरातील मुख्य रस्त्याने हजारो महिलांनी कलश यात्रा व शोभायात्रा काढल्याने रामभक्तांच्या या भव्य मिरवणुकीने गावकऱ्यांचे लक्ष वेधले असल्याचे पहायला मिळाले होते

याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरातील जाज्वल्य श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी कडून मागील सात दिवसा पासून प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अखंड राम कथेचे आयोजन परमेश्वर मंदिर सभागृहात करण्यात आले होते त्याच पार्श्वभूमीवर अखंड हिंदुस्तानचे आराध्य प्रभू श्रीरामाची दिनांक 22 जानेवारी रोजी साडे बारा वाजता मंदिरात विराजमान झाले पाचशे वर्षा अधिकची प्रतीक्षा समाप्त झाल्याचे परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ यांनी यावेळी बोलताना सांगितले हा ऐतिहासिक क्षण शहरातील भाविक भक्तांना दाखवण्यासाठी परमेश्वर मंदिर कमिटी कडून एल.ई.डी मोठ्या स्क्रीनवर आयोजित सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात नंतर प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यासाठी शहरातील आदिवासी समाचे उच्च विभूषित डॉ.गायकवाड साहेब , बौद्ध समाजाचे गौतम हनवते, मातंग समाजाचे प्रकाश विठ्ठल बनसोडे, वडार समाजाचे बालाजी गायकवाड, कैकाडी समाजाचे पापलू जाधव,पारधी समाजाचे श्रीरंग राठोड, वैधु समाजाचे सुरेश देशमुख, गोसावी समाजाचे दिलीप महाराज गिरी,चांभार समाजाचे नामदेव पोहेकर ,भोई समाजाचे साहेबराव आष्टेकर, सह वासुदेव समाजाचे शंकर पाचंगे या समाजातील ११ जोडप्यांना आरती करण्याचा बहुमान दिला यावेळी मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या परम पूज्य चैतन्य महाराज यांच्या मधुर वाणीतून सुरू असलेल्या राम कथे दरम्यान मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर श्रीश्रीमाळ यांच्या नातीने नुकत्याच झालेल्या सी.ए. परीक्षेमध्ये देशात 43 वा क्रमांक घेऊन यश संपादन केले त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या उपस्थितीत तिचा सन्मान केला त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते व नंतर सायंकाळी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त श्री परमेश्वर मंदिर परिसरात ठिकठिकाणी 5000 दिवे प्रज्वलित करून, मंदिर परिसरावर आकर्षक विद्युत रोषणाई करून शहरातील महिला भगिनींनी प्रभू श्रीरामचंद्रांना मानवंदना दिली हा नेंन रम्य देखावा पाहण्यासाठी शहरासह तालुक्यातील असंख्य भाविक भक्तांनी श्री परमेश्वर मंदिर येथे मोठी गर्दी केली असल्याचे पाहायला मिळाले…

यावेळी श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या संचालक मंडळानी शहरात येणाऱ्या सर्व राम भक्तांची मनोभावे सेवा केली त्यामुळे परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटी त्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजते असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले ह्या सर्व सोहळ्यासाठी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांनी शहरात चोख बंदोबस्त लावला होता..