IND vs AUS : भारताने बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-20 सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम खेळून कांगारूंना 161 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर सामना 19 षटकांपर्यंत कांगारूंच्या हातात राहिला, मात्र अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. यासह भारताने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली.
भारताच्या 161 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 8 गड्यांच्या मोबदल्यात 154 धावाच करू शकला. भारतातर्फे अक्षर पटेलने चार षटकात अवघ्या 14 धावा देत एक विकेट घेतली. तर रवी बिश्नोईने 29 धावांत 2 गडी बाद केले. मुकेश कुमारने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
भारतीय संघाने दिलेल्या 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हेडने पहिल्याच षटकातच ताबडतोड सुरुवात केली आणि एकापाठोपाठ एक चौकार मारले. हेडने 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने ऑस्ट्रेलियाला स्फोटक सुरुवात करून दिली.
वादळी सुरुवातीनंतर टीम इंडियाचा डाव गडगडला, ऑस्ट्रेलियाला 161 धावांचे लक्ष्य
मात्र, दुसऱ्या टोकाला फलंदाजीला आलेल्या जोश फिलिप अवघ्या 4 धावांवर मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर रवी बिश्नोईनेही ट्रॅव्हिस हेडला 28 धावांवर बाद केले. मात्र, बेन मॅकडरमॉटने 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली.
त्यांच्याशिवाय टीम डेव्हिड 17 धावा करून बाद झाला आणि मॅथ्यू शार्ड 16 धावा करून बाद झाला. काही काळ तो ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देईल असे वाटत होते, परंतु अर्शदीप सिंगने त्याला अखेरच्या षटकात लाँग ऑनवर झेलबाद करून सामना भारताच्या झोळीत टाकला. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दहा धावांची गरज होती, पण अर्शदीपने केवळ 4 धावा काढल्या आणि मॅथ्यू वेडची अत्यंत महत्त्वाची विकेटही घेतली.
नाशिकमध्ये विश्वंभर चौधरींवर हल्ला; भर कार्यक्रमात व्यासपीठावरच घडला प्रकार
भारतासाठी श्रेयस अय्यरने 37 चेंडूत 53 धावांची खेळी केली, त्याच्याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माने 16 चेंडूत 24 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी अक्षर पटेलनेही 21 चेंडूत 31 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या 20 षटकांत 8 विकेट गमावून 160 धावांवर नेली.
संबंधित बातम्या
वेब स्टोरीज