India Pakistan War | पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना (Terrorist) घरात घुसून मारले. त्यानंतर, चवताळलेल्या पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यास सुरुवात केली असून दोन्ही बाजूने गोळीबार सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच, गुरुवारी रात्रीच्या सुमारास पाकिस्तानने भारतातील विविध शहरांत ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय वायू दलाने पाकचे ड्रोन हवेतच जिरवले. आता, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांच्यासह कर्नल सोफिया कुरेशी (Sofia qureshi) आणि व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन कालच्या युद्धभूमीवरील घडामोडींची माहिती दिली. पाकिस्तानने (Pakistan) सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आणि 400 ड्रोनच्या सहाय्याने 36 ठिकाणी हल्ले केले. त्यापैकी बहुतांश ड्रोन भारतीय सेनेने पाडले.
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या इतक्या मोठ्या ड्रोन हल्ल्याचा अर्थ असा होता की, त्यांना भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेची ताकद जाणून घ्यायची होती. हे ड्रोन तुर्कीचे होते. पाकिस्तानने टाकलेले बहुतेक ड्रोन भारताने नष्ट केल्याची माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
8 मे रोजी गुरुवारी रात्री 8 ते 9 मे दरम्यान पाकिस्ताननं भारतीय हवाई सीमेचं उल्लंघन केलं, नागरी विमानांना ते ढाल म्हणून वापर करत आहेत.
नियंत्रण रेषेवर पाकिस्तान सैन्याची गोळीबारी, पाकिस्तानने जम्मू काश्मिरमध्ये उरी, पूँच, राजोरी, उधमपूर, अकनूरसह विविध ठिकाणी ड्रोनहल्ले केले.
आंतरराष्ट्रीय सीमा रेषा आणि नियंत्रण रेषेवर 300 ते 400 ड्रोनचा वापर, भारतानं यातील बहुतांश ड्रोन पाडले
पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर हवाई घुसखोरीचा प्रयत्न, एअर डिफेन्स यंत्रणेची माहिती गोळा करणे, गोपनीय माहिती गोळी करण्याचा प्रयत्न
ड्रोनच्या अवशेषांवरुन समजतं की, ते ड्रोन तुर्की बनावटीचे आहेत.
पाकिस्तानच्या सशस्त्र UAV ने भंटिडा सैन्य स्टेशनला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, तो निष्क्रीय करण्यात आला
भारताकडून पाकिस्तानमध्ये चार हवाई रक्षण यंत्रणांवर हल्ले करण्यात आले, त्यात एक यंत्रणा उद्धवस्त करण्यात आली.
उरी, पुंछ, राजौरी, उधमपूर यासह इतर ठिकाणी ड्रोन आणि गोळीबारात भारतीय सैन्याचे काही जवान जखमी झाल्याची माहिती दिली.
पाकिस्तानकडून झालेला ड्रोन हल्ला हा सैन्य दलाच्या प्रतिष्ठेला नागरिकांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न होता.