नांदेड दि. १६ :- दिनांक १९ फेबुवारीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची जिल्हयात जोरदार तयारी सुरू आहे. शिवराज्याभिषेकाच्या साडेतीनशे वर्षे पूर्ण होण्याच्या मुहूर्तावर यावर्षीची शिवजयंती उत्साहात साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने ५फेब्रुवारी ३०२४रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. या परिपत्रकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनांक १९ फेब्रुवारी २०२४निमित्त विविध उपक्रमासंदर्भात करावयाच्या आयोजनाबाबत निर्देश दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील संबंधित विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी शासकीय,निमशासकीय कार्यालयात जयंती निमित्त विविध उपक्रम आयोजित करावेत. ग्रामपंचायत ते महानगरपालिका स्तरावर व विविध संस्थांमध्ये हा उत्सव साजरा करण्यात यावा तसेच शिवरायांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. छत्रपतींच्या प्रेरणादायी जीवन चरित्रावर आधारित विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करावे, या संदर्भात शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड