३० नोव्हेंबर पर्यंत पक्षांतर्गत सर्व प्रक्रीया पूर्ण होईल त्यानंतरच शपथविधी होईल.भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांची माहिती
मुंबई दि.२६: अगोदर भाजप आमदारांची बैठक होईल. निरीक्षक मुंबईत जातील. त्यानंतर आमदारांचं म्हणणं पक्षश्रेष्ठींना कळवलं जाईल. त्यानंतर शपथविधी होईल.५ डिसेंबरला होणार शपथविधी मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही उद्या देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी नियुक्ती होणार महायुती उद्याच सत्ता स्थापनेचा दावा करणार
राज्यपाल यांच्याकडून २९ तारखेला शपथविधीचे निमंत्रण जारी होईल काल देवेंद्र फडणवीस ओम बिर्ला यांच्या मुलीच्या लग्नाला गेले होते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याशी कोणतिही नियोजीत भेट नव्हती
राजीनामा दिल्यानंतर सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे काळजी वाहू मुख्यमंत्री राहतील ५ तारखेपर्यंत महायुतीत कोणाला कोणते खाते दिले जाणार हे निश्चित केले जाईल यानुसार ५ तारखेला २९ ते ३० आमदार कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतील.
#सत्यप्रभा न्युज #मुंबई













