विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.३: ११ वीत शिकणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे सोमवारी (२ डिसेंबर) पहाटे अपहरण झाल्याची घटना जाधववाडीतील गोकुळनगरात समोर आली आहे. हर्सूल पोलीस ठाण्यात मुलीच्या पित्याने तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तक्रारीत पित्याने म्हटले आहे, की मुलीने सोमवारी रात्री कुटुंबासह जेवण केले. रात्री १० ला सर्वजण झोपी गेले. पहाटे तीनला मुलीचे वडील उठले असता त्यांना मुलगी घरात दिसली नाही. त्यांनी पत्नीला उठवून ही बाब सांगितली. त्यांनी परिसरात मुलीचा शोध घेतला, नातेवाइकांकडेही चौकशी केली. मात्र मुलीचा शोध लागला नाही. अखेर हर्सूल पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार करण्यात आली. मुलगी ११ वीत शिकत होती. तिने सोबत मोबाइलही नेला नाही. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश केदार करत आहेत.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर