नांदेड दि.१८ संष्टेबर : -येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या द्वितीय गुणपत्रिकेवर डुप्लिकेट कॉपी एवजी द्वितीय कॉपी विद्यार्थ्यांना देण्यास भाग पाडणाऱ्या पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांचे विद्यार्थी वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठा अंतर्गत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक गहाळ झाल्या नंतर शंभर रुपये शुल्क आकारून परीक्षा विभागाकडे द्वितीय गुणपत्रकाची विध्यार्थी मागणी करण्यात येत होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाने द्वितीय गुणपत्रक देत असतांना डुप्लिकेट कॉपी असा स्टॅम्प मारून सर्रास गुणपत्रक वाटप सुरू केले होते. ही बाब पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांना कळताच त्यांनी तात्काळ कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या कडे, डुप्लिकेट गुणपत्रिके मुळे विद्यार्थ्यांत संभ्रम निर्माण होत असल्याची तक्रार करून. गुणपत्रिकेवर डुप्लिकेट कॉपी एवजी गुणपत्रिकेची द्वितीय प्रत असे गुणपत्रक द्यावेत अशी विनंती केल्याने किशोरकुमार वागदररीकर यांच्या पत्राची दखल घेऊन प्र. संचालक हुशारसिंह साबळे परीक्षा व मुल्यमापन मंडळ विभागाने तात्काळ दखल घेत. द्वितीय मार्क मेमोवर डुप्लिकेट कॉपी एवजी यापुढे आता सेकंड कॉपी असा उल्लेख असलेला मार्क मेमो विद्यार्थ्यांना देत असल्याचे कळवले आहे.














