लेखणीच्या बादशहा म्हणून एक वेगळी ओळख.कमी वयात मोठा जलसंपर्क आजी-माजी लोकप्रतिनिधी कडून शुभेच्छा पत्राद्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव.
नांदेड दि.१५: हिमायतनगर शहरातील हुशार संयमी व शांत स्वभावाने परिचित असलेल्या नागेश परमेश्वर शिंदे यांचा जन्म एका गरीब कष्टकरी कुटुंबात १५मार्च ११९४ रोजी झाला
नागेश ला लहान पणापासून मित्र सवंगडी जपण्याची सवय नेहमी समाजात वावरत असताना आपल्याला कुठल्याही गोष्टीत यश मिळो अथवा न मिळो पण समजाप्रती आपलं काहीतरी देणं आहे या विचाराचा वारसा घेऊन पत्रकारित्रा क्षेत्रात धडाडीने अन मोठ्या धाडसाने सामाजिक सेवा करणारे हिमायतनगर शहरातील सर्वांना परिचित असणारे पत्रकार नागेश शिंदे
लहान वयात प्रचंड जनसंपर्क आणि वडिलांकडून पत्रकारितेचा मिळालेला वारसा, अनुभव घेऊन आज पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी स्वतः चे एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.सत्य तेच पण धाडसाने, प्रकर्षाने सर्वांसमोर आपल्या लेखणीतून मांडणारे निडर पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे.आपला वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत ते पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. गोर गरीब, शोषित, पीडिताच्या समस्या, अडचणी, प्रश्न वेळोवेळी शासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.अनेक नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करत सर्वांशी चांगले संबंध ठेवण्याचा त्यांचा हातखंडा आहे.विशेष म्हणजे नाभिक समाजासाठी एक युवा नेतृत्व म्हणून त्यांचे कार्य वाखानण्याजोगे आहे. विविध उपक्रम, जयंती, समारोह आयोजित करत नाभिक समाजाला एकत्र करत त्यांचे प्रबोधन करण्याचे कार्य ते मोठ्या प्रामाणिकपणे करताना आढळतात.
हिमायतनगर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात त्यांची सामाजिक, राजकीय, धार्मिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचे चांगले प्रस्त आहेत. राजकीय क्षेत्रातही पत्रकार नागेश शिंदे यांचे काम उल्लेखनीय आहे. गेल्या विधानसभेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संयोजक म्हणून त्यांनी महायुती साठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील सी.पी.क्लब येथे सत्कार केला यावरून त्यांच्या राजकीय कार्याची ओळख दिसून येते. संयमी अन समंजसपणे आपले काम करून घेण्याची त्यांची वेगळीच शैली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील प्रत्येक अपडेट व ब्रेकिंग न्युज इलेक्ट्रॉनिक मीडिया वर पोहोचवण्यासाठी पत्रकार नागेश शिंदे यांचे मोठे योगदान आहे. साम टीव्ही, झी 24 तास,न्युज 18 मराठी,लोकशाही यासह इतर अनेक आघाडीच्या मराठी न्युज चॅनेल वर हिमायतनगर तालुक्यातील बातम्या झळकविण्याचे काम ते करतात. यासह दैनिक मराठवाडा नेता व दैनिक एकमत या वृत्तपत्राद्वारे शोषित पीडिताचा आवाज बनून प्रत्येक बातमी ते बनवत असतात.प्रत्येक कार्यालयातील गोंधळ असो की बनवाबनवी हे कधीच त्यांचे नजरेतून गेले नाही. ते सडेतोड पणे आपल्या लेखणीच्या माध्यमातून सत्याची बाजू घेत बातम्या प्रसारित करतात हिमायतनगर तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात पत्रकार नागेश शिंदे यांचे उल्लेखनीय कार्य आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीशी जोडलेली नाळ अन माणसं जोडून ठेवणारी त्यांची बोली यामुळे त्यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत.हिमायतनगर तालुक्यात युवा पत्रकार म्हणून नागेश परमेश्वर शिंदे यांचे वर्चस्व वेळोवेळी दिसून येते. मराठी पत्रकार संघांचे तालुका उपाध्यक्ष, भाजपा चे सोशल मीडिया नांदेड उत्तरचे जिल्हा संयोजक तसेच विविध संघटनाचे पदाधिकारी म्हणून त्यांनी अनेक पदावर कार्य केले आहे.
गेल्या वर्षात झालेल्या त्यांच्या बंधू व वडील यांच्या निधनाच्या दुःखातून ते सावरत घर, व्यवसाय आणि पत्रकारिता सांभाळतात.आपल्या घराची ढाल बनत कुटुंबप्रमुख म्हणून घर सांभाळणारे मोठया जिद्दीने आलेल्या प्रत्येक संकटाना तोंड देत उभे आहेत. त्यांच्या प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीला माझा सलाम हिमायतनगर शहरातील लेखणीचा बादशाह पत्रकार नागेश दादा शिंदे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व त्यांना पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड