हिमायतनगर प्रतिनिधी | तालुक्यातील दुय्यम बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कामारी येथील बौद्ध आणि मातंग समाजाच्या स्मशानभूमी च्या जागेवरील प्रशासनाने आखणी करून दिलेल्या जागेवरील असलेले अतिक्रमण तात्काळ हटवावे ह्या मागणी साठी मोजे कामारी येथील ग्रामस्थांनी हिमायतनगर तहसीलदार यांना एका लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे
हिमायतनगर तालुक्यातील मौजे कामारी येथील बौद्ध व मातंग समाजाच्या स्मशान भूमीवरील अतिक्रमण दिनांक 9 एप्रिल पर्यंत काढण्यात आले नाही तर सर्व समाज बांधव तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाचा अवलंब करून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी ह्या निवेदनात सांगितले यावेळी निलाबाई नामदेव नरवाडे, सयाबाई चोखा नरवाडे,विजय सोनुले सरपंच प्रतिनिधी ,वैभव नरवाडे कामारीकर, बाबासाहेब नरवाडे, दिपक भवरे, पंडित नरवाडे, प्रल्हाद नरवाडे , कमल नरवाडे, कलावतीबाई नरवाडे, रुख्मीणबाई कांबळे, शकुंतलाबाई इंगोले, सुनिताबाई कांबळे, पुष्पाबाई भवरे, गिरजाबाई काळे, राजेशबाई नरवाडे, पंचशीला कदम, पंचफुलाबाई नरवाडे, निरंजन कांबळे , किरण नरवाडे गणेश कांबळे यांच्या सह अनेकांच्या ह्या निवेदनावर सह्या आहेत.