नांदेड दि.२०: कंधार तालुक्यातील शिरूर परिसरात शनिवार दि.१६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले असून अक्षरशः थैमान घातले. या अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हळद, उन्हाळी ज्वारी, भुईमूग, करडई सह अन्य पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले.
मु.शिरूर ता.कंधार जिल्हा.नांदेड येथील बाबाराव गोविंद वाघमारे यांच्या शेतात असलेला gk एनर्जी चा सोलार पॅनल चे खूप नुकसान झाले आहे. रात्री झालेला वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या सर्वत्र हळद काढणे, गहू कापणे राशी करणे ही शेतकऱ्यांची कामे चालू असून कापलेल्या गव्हाचे काड शेताने उघड्यावरच असल्याने या अचानक आलेल्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास अशा अस्मानी संकटामुळे हिरावला गेल्याने शेतकरी वर्ग अक्षरशः हैराण झाला आहे. सोबतच शिरूर येथील बाबाराव गोविंद वाघमारे यांच्या शेतात असलेल्या gk सोलरच्या एकूण 7 पॅनलचे मोठे नुकसान झाल्यामुळे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













