धर्माबाद दि.६ ता.प्र.दत्तात्रय सज्जन :- येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा दैनिक प्राप्ती टाईम चे संपादक पी जी कोटूरवार यांची नुकतीच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कनसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.योगेश जोशी, रसायनशास्त्र विभागाचे प्रोफेसर शिवाजी पटवारी यांच्या वतीने पी जी कोटूरवार यांचे अभिनंदन करण्यात आले,तर यावेळी दैनिक प्राप्ती टाईमचे धर्माबाद प्रतिनिधि पांडुरंग जाजुलवाड यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रा.कुलदीपक गच्चे, डॉ.बालाजी श्रीगिरे,डॉ.माधव हळदेकर, प्रा.सतीश पवार यांची उपस्थिती होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
