ता. प्र. दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.१२: शहरातील भवानी टेकडीच्या पायथ्याशी असलेले रामनगर येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर सभागृहाच्या बांधकामांचे शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा तिम्मापुरे व माजी शिक्षण सभापती सौ. सपना कृष्णा तिम्मापुरे यांच्या शुभहस्ते श्री. हनुमान जन्मोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी सकाळी करण्यात आले.
रामनगर येथील सुप्रसिध्द असलेल्या श्री. हनुमान मंदीर परीसरात श्री. लक्ष्मीनारायण मंदिर असून मंदीराच्या बाजूलाच सभामंडपासाठी जागा उपलब्ध असून सदरील जागेवर सभामंडपाचे बांधकाम केल्यास धर्माबाद तालुक्यातील सर्व जाती धर्मातील गोर गरीब लोकांचे लहान मोठे कार्यक्रम पार पडतील हे ध्येय व सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी उराशी बाळगून व्यंकटेश गोपाळ गुजराथी यांनी सभामंडपाचे बांधकाम करण्याचा संकल्प तीन ते चार वर्षांपूर्वी केला होता. त्यामुळे व्यंकटेश गोपाळ गुजराथी यांनी श्री. हनुमान जन्मोत्सवाच्या शुभमुहूर्तावर शनिवारी सकाळी त्या सभामंडपाच्या बांधकामांचे भूमीपूजन धर्माबाद नगरपरिषदेचे माजी शिक्षण सभापती सौ. सपना कृष्णा तिम्मापुरे या दाम्पत्याच्या शुभहस्ते करून घेतला आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी सामाजिक कार्यात व्यंकटेश गोपाळ गुजराथी यांनी आर्थिक मदत केलेली आहे. सदरील सभामंडपाच्या बांधकामांचे भूमीपूजन बाळापूर येथील महेश जोशी महाराज यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा व अर्चना करून करण्यात आले. ४०/८० चौरस फूट असलेल्या प्रशस्त जागेवर सभामंडपाचे बांधकाम मंगळवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे व्यंकटेश गोपाळ गुजराथी यांनी बोलताना सांगितले आहे. स्वयंनिधीतून एक सामाजिक व धार्मिक दायित्व जोपासत तब्येत तीन लाख रुपये खर्चाच्या या सभामंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी शामसेठ गुजराथी, सेवानिवृत्त प्राध्यापक चंद्रकांत गुजराथी, राजू शेट्टी, गंगाधर पाटील बन्नाळीकर, किशन गोडगुलवार, डॉ. विजय अंकमवार, भूमन्ना अबुलकोड,माजी नगरसेवक राजेश जाकापुरे, पोलिस पाटील साईनाथ पूरणशेट्टीवाड, नरेंद्र गुजराथी, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष संजय कदम,विरभद्र बसापुरे, विनोद चिद्रावार व असंख्य भाविक उपस्थित होते. व्यंकटेश गुजराती यांच्या उपरोक्त कार्याचे शहरात कौतुक होत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड