श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथे भागवत कथेचे आयोजन
हिमायतनगर ता. प्र नागेश शिंदे दि.२८: शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटी कडून पवित्र श्रावण मासानिमित्त दरवर्षी भव्य संगीतमय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंदिर कमिटीकडे कडून आयोजित करण्यात येते यावर्षीची श्रावणातील शेवटची कथा दिनांक २४ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान दररोज दुपारी दोन ते पाच या वेळात ह.भ. प.भागवताचार्य कु. वैष्णवीदीदी गोड सोनखेडकर यांच्या मधुर वाणीतून मंदिर परिसरात सुरू आहे यावेळी भागवत कथेमध्ये बोलताना भागवताचार्य कु. वैष्णवीदीदी यांनी असे सांगितले की भागवत कथा ऐकल्याने मानवी जीवनाचा उद्धार होतो मानवी जीवनात जन्म झालेल्या प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी आयोध्या येथील प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन आनंद प्राप्त करावा असे संत प्रवचन सांगितले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की ७१ वर्षानंतर आलेल्या या पवित्र श्रावण मासानिमित्त महादेवाच्या दर्शनाला अधिकाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे या पवित्र श्रावण मासाच्या शेवटच्या सप्ताहामध्ये हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटी येथे ह.भ.भागवताचार्य कु. वैष्णवीदिदी गोड सोनखेडकर यांच्या मधुर वाणीतून भव्य संगीतमय भागवत कथेचे आयोजन सुरू आहे ही कथा श्रवण करण्यासाठी हिमायतनगर तालुक्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मंदीर परिसरात मोठी गर्दी केली असल्याचे पाहायला मिळत आहे या कथेप्रसंगी बोलताना भागवताचार्य कु. वैष्णवीदीदी यांनी असे सांगितले की जीवनात मान आणि अभिमान या दोघांनाही दूर ठेवले पाहिजे या दोन्ही गोष्टी वाढायला लागल्या की माणसातील अहंकाराची उत्पत्ती वाढते तेव्हा ज्ञानाचा व बुद्धीचा ऱ्हास अटळ होतो रावणाच्या जीवनातही तसेच घडले होते त्यामुळे आपण हा एक धडा शिकला पाहिजे शुद्ध पाण्यासारखे मन आणि शुद्ध वाणी ठेवून या जगात भागवत ग्रंथाचे ज्ञानार्जन करून जीवनाचा उद्धार कसा करावा हे आपण शिकले पाहिजे मानव जातीने भागवताकडे केवळ कथा म्हणून न पाहता या कथांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे आणि आपण यातील काय आत्मसात करायचे हे आपल्याला समजायला हवे त्यामुळे भागवत ग्रंथ हा प्रत्येकाने आपल्या घरात ठेवून त्याचे ज्ञान संपादित करा असे अनमोल मार्गदर्शन भागवताचार्य वैष्णवीदिदी गोड यांनी यावेळी सांगितले त्यामुळे श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी येथे सुरू असलेल्या भव्य संगीतमय भागवत कथेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ यांनी केले यावेळी संगीत विशारद गणेश महाराज पळशीकर, सिंथ वादक गंगाधर अंतेश्वरकर, तबला वादक अमोल लाकडे, पॅड वादक बालाजी गुंडेकर सह श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे संचालक सौ लताताई मुलंगे, अनिल मांदसवार, संजय माने, विलास वानखेडे सह हजारो भाविक भक्त व ज्येष्ठ नागरिक या भागवत कथेमध्ये उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड