नांदेड | दि.२४: स्थानिक गुन्हा शाखेतील कर्तबगार सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांनी आपले सक्षम नेतृत्व असलेल्या पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात एका चोरट्याला पकडून भाग्यनगरमधील दोन आणि शिवाजीनगरमधील एक अशा तीन चोरीच्या घटना उघड केल्या आहेत. या चोऱ्यांमधील 2 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार शहरात घरफोड्या करणारा एक व्यक्ती राजू उर्फ कॅली अशोक वाघमारे (25) रा.तेहरानगर नांदेड यास ताब्यात घेतल्यानंतर विचारपुस करून भाग्यनगर येथील चोरीचे गुन्हे क्रमांक 299/2023, 300/2023 आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 153/2023 उघडकीला आले. पकडलेल्या राजू उर्फ कॅली वाघमारेकडून स्थानिक गुन्हा शाखेने दोन तोळे सोन्याचे दागिणे, एक लॅपटॉप, एक ऍपल आयपॅड, एक सॅमसंग कंपनीचा टॅब आणि दोन हार्डडिस्क जप्त केल्या आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माधव केंद्रे, पेालीस अंमलदार गुंडेराव कर्ले, शेख मोहसीन, संग्रमा केंद्रे, बालाजी तेलंग, हनमंत पोतदार, विष्णुकांत इंगळे, रुपेश दासरवाड, संजीव जिंकलवाड, विलास कदम, गजानन बैनवाड, रणधिर राजबन्सी, बालाजी यादगिरवाड, बजरंग बोडके, धम्मा जाधव, मोतीराम पवार, ज्वालासिंग बावरी, मारोती मोरे, सायबर विभागातील दिपक ओढणे, राजू सिटीकर यांनीही कार्यवाही पार पाडली.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड