सातारा | शाहू चौक सातारा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती मागील 4 महिन्यापासून कुठे गायब? याबाबत नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी यानी जाहीर खुलासा करावा. अर्धाकृती पुतळा काढून त्याचे का पावित्र्य राखले गेले नाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्धा कृती पुतळा अवमान प्रकरणी संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
सातारा शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा सन्मान राखत तात्काळ नगरपालिका सभागृहात किंवा छ. शिवाजी महाराज संग्रहालय सातारा येथे सुरक्षा व अभिवादन यासाठी ठेवण्यात यावा या मागणीला घेवून दिनांक. 25 मार्च 2025 पासून समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहे.
तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा बनविण्याचे काम झालेच पाहिजे आणि 14 एप्रिल च्या आधी सदरील पुतळा बसविला पाहिजे जेणेकरून नागरिक अभिवादन करतील. पूर्णाकृती पुतळा बनविण्यासाठी सर्व माझ्यासह सर्वच सातारकर यांची भूमिका आहे. पूर्णाकृती पुतळा चे लवकर पूर्ण व्हावे.
अशा घटना./ कृती बाबत सर्व बांधवानी या घटनेच्या बाबत गांभीर्याने माहिती घेवून प्रशासनाला प्रश्न विचारले पाहिजेत नाहीतर प्रशासनाच्या नावाखाली असेच सुरू राहील