• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, July 7, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुंबईत ठाकरेंना धक्का बसणार? माजी नगरसेवकांच्या पाठिंब्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
30 May 2023
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
image editor output image1618622769 1685467717878
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

मुंबई दि.३०: शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडाळाचा विस्तार होताच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे. तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदाराला प्रत्येकी चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती शिंदे गटातील सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी सापळे रचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
भाजप आणि शिंदे गटाने मुंबईत का लक्ष केंद्रित केले?
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा आहे. या श्रीमंत महानगरपालिकेतील ठाकरेंची सत्ता उलथवून महापालिका ताब्यात घेण्यासाठी आता मुख्यमंत्री शिंदे सरसावले आहेत. भाजप आणि शिंदे हे राज्यात सोबत आहेत, त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेत देखील सत्तेत येऊ इच्छित आहेत. तसेच ठाकरे गटाची मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता आहे. त्यावरच आधारित राजकारण ठाकरे करतात. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर आता भाजपा तसेच शिंदे गटाने लक्ष केंद्रित केले आहे. विस्तारानंतर सुमारे 40 ते 45 माजी नगरसेवक शिंदे गटात?
मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदारांवर शिवसेनेच्या चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते. तशी व्युहरचना केली जात आहे. शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांमध्ये मुंबईतील पाच आमदार आहेत. त्यात मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे या आमदारांचा समावेश आहे. या आमदारांवर आणि मुंबईतील काही पदाधिकाऱ्यांवर शिंदे गटाची मोठी मदार आहे. शिंदे गटात दाखल झालेले खासदार राहुल शेवाळे यांच्यावरही मुंबई महानगरपालिकेची विशेष जबादारी सोपवण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सुमारे 40 ते 45 माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे.शिंदे गटाची व्युहरचना ठरली
शिवसेनेचे माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्यास शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत ताकद नाही, मात्र ठाकरे गटातील नगरसेवक फुटल्यास ताकद वाढणार आहे. शिवसेनेचे मुंबईतील माजी नगरसेवक फोडल्यास आणि आगामी निवडणुकीत त्यांना बळ दिल्यास त्यांना त्यांच्या जागी पुन्हा निवडून आणणे सोपे होणार आहे. त्यामुळे शिंदे गटात सहभागी असलेल्या आमदार, खासदार आणि मुंबईतील इतर पदाधिकारी यांनी मुंबईतील माजी नगरसेवक आणि इच्छुक यांना आपल्याकडे कसं वळवावं आणि कोणकोणत्या भागात काम करेल याबाबत व्युहरचना शिंदे गट करत असल्याची माहिती आहे.
शिंदे हे देखील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत आहेत
ज्येष्ठ नेते आणि शिवसैनिकांची बांधणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी, गजानन कीर्तिकर, रामदास कदम, लिलाधर डाके यांच्या भेटी त्यांनी घेतल्या. शिवसेनेने अडगळीत टाकलेल्या ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ शिवसैनिकांच्या भेटी घेऊन मोर्चेबांधणीला मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरुवात केली आहे. पुढील लढाईत हे ज्येष्ठ नेते आणि शिवसैनिकांची मदत घेऊन ठाकरे गटाला आव्हान देणे शिंदे गटाला सोपे होईल. त्यामुळेच या भेटीगाठी सुरु असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे
मुंबईत हळूहळू पाठिंबा वाढतोय
ठाणे आणि नवी मुंबईतील काही माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. मुंबईतील माजी नगरसेवकांनी अद्याप कोणतीही हालचाल केली नसली तरी शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे अशी चर्चा आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते. शिवसेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवक, प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी मुंबईतील कार्यकर्त्यांसह शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. तसेच कालच शिवसेनेच्या ज्येष्ठ मुंबईतील पदाधिकारी संध्या वढावकर आणि ईशान्य मुंबईतील काही कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी झाले आहेत. अशाचप्रकारे हळूहळू मुंबईतून शिंदे गटाला शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा वाढत आहे. ठाकरे गटासाठी ही धोक्याची घंटा आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड

Previous Post

हळदही लागली, लग्नही झालं, पण मधुचंद्रासाठी नकार, तिथंच शंकेची पाल चुकचुकली! नाशिकमधील प्रकार

Next Post

जून 2023 च्या नेट परिक्षेकरिता अर्ज भरण्यासाठी ३१ मे अंतिम मुदत

Next Post
image editor output image56760433 1685520465425

जून 2023 च्या नेट परिक्षेकरिता अर्ज भरण्यासाठी ३१ मे अंतिम मुदत

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026

    Recent News

    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026
    IMG 20260629 WA0335

    हदगाव तालुक्यात ३० जूनपासून मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम!

    29 June 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज