मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीमधून सकाळी 10 वाजता निघणार, 27 तारखेला जुन्नरमध्ये शिवनेरीवर मुक्काम करणार, चाकण, खेड पुढे वाशी आणि चेंबूरमार्गे मुंबईत आंदोलनासाठी पोहोचणार असल्याचं जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सांगितलं.
४ महिन्यांपूर्वी आम्ही मुंबईत आंदोलनात घोषणा केली होती. पण चार महिने सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. अंतरवालीत या असं फडणवीसांना सांगितलं होतं. फडणवीसांनी आडमुठेपणा करू नये. असेही जरांगे म्हणाले.
मराठी आणि कुणबी एकच आहेत असा जीआर काढा आणि त्याची अंमलबजावणी करा, त्याच्याशिवाय मी एकही मागणी मागे करणार नाही. मराठ्यांनी काम-धंदे बंद करा, आता मुंबईला जायची तयार करा, असा उठाव पुन्हा होणार नाही, एकजुटीचा असा सोहळा पुन्हा होणे नाही. म्हणून या लढाईत मराठ्यांनी सहभागी व्हा. असे ते म्हणाले…
“बीडचे मराठे एकत्र यायला लागले आहेत. तुम्हाला काय सांगू? तुम्ही एकत्र आल्यामुळे त्यांची अशी फाटली… मला इथे आल्यावर लक्षात आलं. आपण एकत्र आल्याने समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या हे समजून घ्या. गडबळ, गोंधळाने आपल्या समाजाच्या लेकरांचं वाटोळं होत आहे. कोणत्या वेळेला कोणतं पाऊल उचलायचं हे मराठ्याला लवकर समजायला हवं. परिस्थितीने मराठ्यांवर संकट आणून सोडलं आहे. या संकाटात आपण पुढचा काळ लढणार आहोत”, असं मनोज जरांगे म्हणाले.