नांदेड दि.२५ : मराठवाड्यातील पाणीपुरवठ्यासह मूलभूत सोयी सुविधांच्या अनुषंगाने खा.डॉ.अजित गोपछडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली. मराठवाड्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी निधीची विशेष तरतूद करावी अशी मागणी ही यावेळी खासदार गोपछडे यांनी केली आहे .
स्वतंत्र भारतामध्ये मराठवाडा तब्बल एक वर्षानंतर स्वतंत्र झाला त्यामुळे मराठवाड्याचा विकास आजपर्यंत म्हणावा तसा झाला नाही.भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ नंतरही मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यात आलेला नाही.मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न,कृषी सिंचनाचा प्रश्न,रोजगार,उद्योग,शिक्षण,आरोग्य,ग्रामीण विकास यासह अनेक प्रश्न आजही जसेच्या तसे आहेत.मराठवाडा दुष्काळग्रस्त भाग म्हणून आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा भाग म्हणून ओळखला जातो. मराठवाड्याला लागलेला दुष्काळग्रस्ततेचा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी हा कलंक पुसून काढण्यासाठी मराठवाड्यात विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष निधीची तरतूद करावी.वॉटर ग्रीडचा प्रकल्प त्वरित सुरू करून तो पूर्णत्वास न्यावा.कृषी सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाणी वाटपाचा न्यायिक प्रश्न मार्गी लावावा याशिवाय रोजगार निर्मिती,महिला आर्थिक सक्षमीकरण,विकास,सहकार क्षेत्रासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार,बायोगॅस योजना प्रकल्प सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी शेतकरी व संबंधित योजना याना अनुदान देण्यात यावे व मराठवाडा विकास सिंचन,शिक्षण,कृषी,आरोग्य,रेल्वे, रोजगार,विमान उडान योजना,वीज निर्मिती प्रकल्प,नांदेड मध्ये सोयाबीन इंडस्ट्री उद्योग सुरू करण्यासाठी व नांदेड येथून मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी आदी प्रश्न सोडवावेत यासाठी आपण स्वतः लक्ष द्यावे अशी विनंती ही खा.डॉ.अजित गोपछडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड