संकल्प फाउंडेशन धर्माबाद च्या किशोरीन मुलीच्या कार्यशाळेला १८०० किशोरवयीन मुलींची लढाई
धर्माबाद दि.२६: ता.प्र. दत्तात्रय सज्जन
धर्माबाद संकल्प फाउंडेशन धर्माबाद च्या वतीने तूच तुझ्या जीवनाची शिल्पकार स्पर्श या किशोरवयीन मुलींच्या कार्यशाळेचे आयोजन दिनांक 25 जुलै रोजी टी एच आर फंक्शन हॉल धर्माबाद येथे करण्यात आले होते .या संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष वेंकटेश जोशी व सचिव शिवराज पाटील गाडीवान यांच्या संकल्पनेतून किशोरवयीन मुलींना एकत्र आणून स्पर्श या कार्यशाळेचे आयोजन करण्याचा उद्देश याने सफल झाला .
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मारोतराव पाटील कवळे गुरुजी उद्योजक तथा शेतकरी नेते यांची उपस्थिती होती ,तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून श्रीमती मिनल करणवाल भाप्रसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड या होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री संदीप काळे राष्ट्रीय अध्यक्ष वाईस ऑफ मीडिया तथा संपादक सकाळ वृत्तसमूह ,
प्रणिती ताई देवरे चिखलीकर ,
सौ डॉक्ट अनुराधा पत्की,सौ. सरोजा सोनवणे ,
यांच्यासह धर्माबाद तालुक्याचे तहसीलदार महेंद्रकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड ,एकात्मिक बाल विकास विभागाच्या सौ.पवार
यांच्यासह संकल्प फाउंडेशन चे पदाधिकारी वेंकटेश जोशी शिवराज पाटील गाडीवान, श्री शिवकुमार पाटील, अशोक पाटील वडजे ,दत्तात्रय पाटील कावडे यांची उपस्थिती व्यासपीठावर होती.
दीप प्रज्वलनाने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थिनीने गायलेल्या महाराष्ट्र गीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली .कार्यक्रमाचे सुंदर दमदार प्रास्ताविक संकल्प फाउंडेशनचे सचिव तथा साप्ताहिक आपलं नांदेडचे संपादक शिवराज पाटील गाडीवान यांनी केले आपल्या प्रास्ताविकेत संकल्प फाउंडेशनचा ही कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश आणि ह्या तिसऱ्या वर्षाच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी मीनल करणवाल यांच्या उपस्थितीबाबत सांगितले.
या कार्यक्रमाचा मुख्य हेतू हा किशोरवयीन मुलींना सामाजिक नैतिक जाण व्हावी समाजामध्ये वावरत असताना काय चांगलं काय वाईट ह्या गोष्टीचा ओळख व्हावी आणि आपल्या आई-वडिलांच्या प्रति आदरभाव व सन्मान राखला जावा हा उद्देश होता आणि धर्माबाद तालुक्यातील जवळपास दहा ते बारा शाळेच्या सहभागातून उपस्थित मुलींनी या कार्यक्रमाला दिलेल्या उदंड प्रतिसाद पाहून भारावलो असेही ते म्हणाले .
यानंतर सौ सरोजा सोनवणे यांनी उपस्थित मुलींना मार्गदर्शन करीत असताना आपण आजवर केलेल्या लिखाणातून मुलींच्या विकासासाठी अनेक बाबीचा उल्लेख आपल्या भाषणातून केला .मुलींनी फक्त शिक्षणच नाही तर आत्म संरक्षणाचे ही धडे गिरवले पाहिजेत असेही सौ सोनवणे म्हणाल्या .
यानंतर प्रणिती ताई देवरे चिखलीकर यांनी मुलींना सखोल असे मार्गदर्शन केले. फक्त मुलगी म्हणून चूल आणि मूल सांभाळण्याचा काळ बदललेला आहे आज देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत जाणाऱ्या मुलींची भरारी ही प्रशंसनीय आहे आपल्यासारख्या चिमुकल्या मुली मधूनच उद्या कोणीतरी ह्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी योगदान देणारा असेल आणि ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून संकल्प फाउंडेशनने केलेले कार्य हे अत्यंत प्रशासकीय असल्याचेही प्रणिता ताई देवरे चिखलीकर म्हणाल्या .
यानंतर स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या प्रमुख सौ डॉ .अनुराधा पत्की यांनी मुलींना सखोल अशी मार्गदर्शन केले. आपल्या विविध उदाहरणातून त्यांनी मुलींना नैतिकतेचे धडे दिले अत्यंत हृदयस्पर्शी व भावुक भाषणातून त्यांनी उपस्थित मुलींची मने जिंकली
त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी श्रीमती मीनल करणवाल भाप्रसे यांनी विद्यार्थिनीला मार्गदर्शन करत असताना त्या प्रत्यक्ष व्यासपीठ सोडून मुलींमध्ये आल्या आणि प्रत्येक मुलींना व्यक्तिगत प्रश्न उत्तरे करत कार्यक्रमाची उंची वाढवली .
संकल्प फाउंडेशन ने आयोजित केलेल्या या कार्यशाळेचा मला उपस्थित राहिल्याचा अभिमान वाटते माझ्या नांदेड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची किशोरवयीन मुलींची कार्यशाळा तीन वर्षापासून चालते ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आज २००० मुली एकत्र येऊन हा संकल्प करतात की मला माझ्या आई-वडिलांचे नाव मोठ्या करायचे मला माझ्या गावाचं नाव मोठं करायचंय यापेक्षा अजून शासनाचा दुसरा कुठला मोठा उपक्रम असू शकतो
आज ह्या मुलींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून निश्चितच या मुलींमधून उद्या आयएएस आयपीएस होणार आणि आत्मसंरक्षणाचे धडे गिरवत स्वाभिमानाने आणि नैतिक मूल्याची जोपासना करत या मुली ही शिक्षण घेणार असेही मीनल करणवाल म्हणाल्या .
विद्यार्थ्यांनी त्यांचे लक्ष मोठे ठेवले पाहिजे तरच त्यांचे ध्येय गाठते त्यामुळे आपण कुठल्या गरीब घरातून येत होते हे महत्त्वाचे नसून आपण जर कठोर मेहनत केली तर निश्चितच आपल्याला यशाची शिखरे गाठता येतात याचं प्रत्यक्ष उदाहरण मी स्वतः आहे. मी भारताच्या यूपीएससीच्या परीक्षेमध्ये देशातून 33 वा येण्याचे ठरवले होते आणि तसे एका कागदावर लिहून माझ्या रूममध्ये चिटकवले होते वारंवार त्या कागदाकडे बघून मला प्रेरणा मिळायची की मला भारतामध्ये ३३ वा क्रमांकाने यायचं आहे आणि हे माझे ध्येय होतं जेव्हा परीक्षेचा निकाल आला तेव्हा मी संपूर्ण भारतामधून ३५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. मी ३३व क्रमांक घेण्याचे ध्येय गाठले म्हणून मला ३५वा क्रमांक मिळाला कारण मी सातत्याने त्या आकड्याच्या मागे धावत असताना माझ्या ध्येयाच्या मागे धावत होते आणि मला ते सहजरीत्या प्राप्त झाले. आपणही जर असे आपले एक उद्दिष्ट ठेवून एकनिष्ठतेने प्रामाणिकपणाने अभ्यास केलात तर निश्चितपणे यश दूर नाही तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी एकत्र आणण्याचा जो संकल्प फाउंडेशन ने केला तो निश्चितच वाख्यांनाजोगा. आहे संकल्प फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांना सुरुवातीला मी वेळ देण्यासाठी टाळाटाळ केली होती पण खूप असा सुंदर चांगला कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित करून मला या सगळ्यांचे दर्शन घडवलं हे माझं भाग्यच आहे
उपस्थित मुलींनी मीनल करणवाल यांच्या भाषणाला प्रचंड टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला धर्माबाद शहरातील हुतात्मा पानसरे हायस्कूल, ग्रीन फिल्ड नॅशनल स्कूल, . विस्डम डिगी कन्सेप्ट स्कूल ,उर्दू हायस्कूल, इंदिरा गांधी पब्लिक स्कूल, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, RKSVM सहकार विद्या मंदिर, जिजामाता गर्ल्स हायस्कूल, केशव प्राथमिक विद्यालय ,गुरुकुल विद्यालय या सर्व विद्यालयाच्या विद्यार्थिनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात उद्योजक तथा शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी तुम्ही सर्व शेतकऱ्यांच्या मुली आहात निश्चितच मोठे व्हा शिकत असताना आपला वडील ज्या मातीमध्ये राबतो ज्या शेतीमध्ये दिवसभर खपतो त्या शेतीसाठी काय करता येईल काय आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तसेच शेतीला देता येईल यासाठी मोठी झाल्यावर व शिक्षण घेतल्यावर प्रयत्न करा
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला का आत्महत्या कराव्या लागतात जर अत्याधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान त्याला अवगत झाले तर निश्चितच तो उन्नती करेल आणि त्यासाठी त्याला गरज आहे तुमच्यासारख्या शिकलेल्या मुलींची आणि त्याचा उपयोग आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने शेती करत असलेल्या वडिलांच्या शेतीवर करावा या माध्यमातून आपण खूप मोठी उंच भरारी घ्यावी संकल्प फाउंडेशन आयोजित केलेला कार्यक्रम हा खूपच स्तुत्य व प्रशासनीय आहे असे म्हणत त्यांनी अध्यक्ष व्यंकटेश जोशी व शिवराज पाटील गाडीवान सचिव व संपूर्ण सहकाऱ्यांचे आभार मानले
यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
