नांदेड दि.२४ : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाच्या एम. ए. जनसंवाद आणि पत्रकारिता आणि एम. ए. इलेक्ट्रॉनिक मीडिया या अभ्यासक्रमात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना नांदेड येथील प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने 2016 पासून कै. सुधाकरराव डोईफोडे स्मृती प्रेरणा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार सिंधू महाविद्यालय देगलूरचा माजी विद्यार्थी मिलिंद वाघमारे यांना देण्यात आला. वाघमारे हा कुशावाडी सारख्या ग्रामीण भागातून माध्यमाचे शिक्षण घेण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलात सन 2021 -22 या शैक्षणिक वर्षात एम. ए. जनसंवाद आणि पत्रकारितेला प्रवेश घेतला. या अभ्यासक्रमातून विद्यापीठात प्रथम येत शिक्षण पूर्ण केले आहे. त्याबद्दल प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने कै. सुधाकरराव डोईफोडे स्मृती प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. सिंधू महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून वाघमारे यांचा सन्मान करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गजाननराव पांपटवार म्हणाले की, मिलिंद वाघमारे यांना कै. सुधाकरराव डोईफोडे स्मृती प्रेरणा पुरस्कार मिळाला याबद्दल महाविद्यालय आणि संस्थेला अभिमान वाटतो. या पुरस्काराने वाघमारे यांची जबाबदारी वाढली आहे. पत्रकारितेत काम करताना शोषित, वंचित लोकांचे प्रश्न मांडत सामाजिक भान जोपासले पाहिजे. तर महाविद्यालयाचे प्राचार्य अभिनंदन सिताफुले यांनी बोलताना म्हणाले की, मिलिंद वाघमारे हा अथक परिश्रम करीत विद्यापीठातून प्रथम येत यश संपादन केले आहे. हे महाविद्यालयासाठी कौतुकास्पद बाब आहे.
सिंधू काॅलेज ऑफ आय. टि. ॲन्ड सायन्स देगलूर येथील माजी विद्यार्थी मिलिंद खंडू वाघमारे यांना दि. 22 जानेवारी रोजी कै. सुधाकरराव डोईफोडे स्मृती प्रेरणा पुरस्कार देण्यात आले. या यशाबद्दल तिरुमला फाऊंडेशन नांदेडचे अध्यक्ष गजाननराव पांपटवार, सचिव अशोक दाचावार, सिंधू महाविद्यालयाचे प्राचार्य अभिनंदन सिताफुले आणि प्रा. मिलिंद राजूरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी तिरूमला फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन पांपटवार, सचिव अशोक दाचावार, प्राचार्य अभिनंदन सिताफुले, प्रा. मिलिंद राजुरकर, प्रा.भीमराव दीपके, प्रा. डॉ. सुनिल वाघमारे, प्रा. यशवंत सुर्यवंशी, प्रा. अनुराधा गंधारे, प्रा. ऋतुजा आगलावे, प्रा. सुकन्या सुकाळे प्रा. गणेश जाधव, प्रा. नामदेव बिजलीकर, प्रा. मारोती सोनकांबळे, प्रा. इस्लाईल शेख, प्रा. बळवंत पाटील, प्रा. बुन्नावार मॅडम, श्री .गजानन महाजन आणि सौ. मनिषा कळसकर आदींनी अभिनंदन केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड