
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातील श्रावण बाळ/ संजय गांधी / इंदिरा गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान मंजूर होण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली असून, दिवाळीपूर्वी सर्व लाभार्थ्यांना खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे निराधार लाभार्थ्यांची दिवाळी गोड होईल अशी माहिती आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील श्रावण बाळ/संजय गांधी / इंदिरा गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान मागील अनेक महिन्या पासून रखडले होते. याबाबत काही महिला व पुरुष लाभार्थ्यांनी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट घेऊन रखडलेले अनुदान मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि तहसीलदार गायकवाड यांना निराधारांचे रखडलेले अनुदान तात्काळ मिळून देण्यासाठी सतत शासन दरबारी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले होते त्यानंतर हिमायतनगर तहसिलदार गायकवाड यांच्याशी संपर्क करुन लाभार्थ्याच्या खात्यात वर्ग करण्याच्या सुचना ही दिल्या त्यामुळेच आज अंदाजे ३५०९ निराधार लाभार्थ्यांच्या खात्यात अंदाजे १ कोटी ३९ लक्ष रुपये जमा करण्याची प्रक्रिया प्रशासनाने चालू केली आहे. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे निराधारांच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा होणार असल्यामुळे निराधार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरलेले आहे