ता. प्र. दत्तात्रय सज्जन | धर्माबाद दि.१७: प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे कैवारी, नॉलेज ऑफ सिम्बॉल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त धर्माबादेत निळ्या सागरांची, निळ्या वादळांनी बाबासाहेबांना दोन टप्प्यात मानवंदना दिली.
धर्माबाद नगरपालिका कार्यकक्षेत असणाऱ्या धर्माबाद, रत्नाळी, बाळापूर, रसिक नगर, फुले नगर, रामनगर, रमाई नगर, साठे नगर, हर्ष नगर, सरस्वती नगर, इंदिरानगर असे एकूण जवळपास दहा भीम जयंती मंडळ आहेत १४ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात फुलेनगर स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य पुतळ्यापासून निळ्या वादळांची मोटर सायकल रॅलीने धर्माबादकरांचे लक्ष वेधून घेतले होते हजारो दुचाकीस्वार सदरील रॅलीत सहभागी होत बाबासाहेब उद्धारक घोषणा बाजी करत शहर दणाणून सोडले. त्या रॅलीमध्ये बहुतांशी युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र आपल्या हातात धरले होते. सदरील रॅलीने प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बाभळी फाटा येथे विसर्जन झाले.
दरम्यानच्या काळात प्रत्येक भीम जयंती मंडळातर्फे भरगच्च कार्यक्रम आपापल्या प्रभागात साजरे करण्यात आले. सायंकाळच्या सत्रात सर्व भीम जयंती मंडळांची भव्य दिव्य अशी बाबासाहेबांच्या विविध तैलचित्रांसह व देखाव्यासह शहरातून मिरवणूक निघाली. बाबासाहेबांच्या नवीन जुन्या गाण्यावर निळे वादळ अक्षरशः नॉनस्टॉप थिरकत होते.
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा धर्माबादचे नवनिर्वाचित अध्यक्ष कैलाश डुमणे, माझी अध्यक्ष सदानंद देवके, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कांबळे, पर्यटन सचिव तथा प्रसिद्धी प्रमुख व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष संजय कदम, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ सल्लागार जे के दादा जोंधळे, तालुका अध्यक्ष एकनाथ जिंकले, तालुका महासचिव गौतम देवके, युवा पत्रकार गंगाप्रसाद सोनकांबळे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी जयंती शांततेत व्हावी यासाठी प्रयत्न केले.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी धर्माबाद पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्यामुळे कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड