नांदेड दि.१५ : तमाम हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्रांची येत्या 22 जानेवारी रोजी आयोध्यातील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे . त्यामुळे देशभरात दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याने या दिवशी नांदेड जिल्ह्यातील सर्व मांस विक्री केंद्र बंद आणि दारू विक्री करणारी दुकान बंद ठेवण्याचे आदेश काढावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांनी केली आहे.

तब्बल पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे अखेर आयोजित प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे . खऱ्या अर्थाने हिंदुस्थानातील हिंदू लोकांचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे . येत्या 22 जानेवारी रोजी आयोजित राम लल्लांची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे . या दिवशी प्रत्येक वाडी तांड्यावर , गावागावात, प्रत्येक शहरात आनंद उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने महिला , मुली , अबाल वृद्ध व सर्व समाज बांधव या उत्सवात सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही प्रकारची कायदा व संस्था भंग पावू नये , सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील संपूर्ण मांस विक्री करणारी केंद्र आणि दारू विकणारी दुकाने बंद ठेवावीत त्यासाठी तात्काळ आदेश काढावेत अशी मागणीही ही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासाठी जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड