दिव्यांगाच्या व्यथा दिव्यांगानेच जानल्या
मुदखेड दि.२१: मुदखेड शहरात जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या दिव्यांग बांधवास प्रहार तालुका प्रमुख अनिल शेटे पाटील यांनी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष निधीतून मिळालेली तीनचाकी व्हिलचर भेट दिली.
स्वतः दिव्यांग असतांनाही दुसऱ्याच्या मदतीला धावून जात शेटे पाटील यांनी आपल्या दातृत्वाचा परिचय दिला.
राजवाडी येथे कुटुंबासह वास्तव्यास असणाऱ्या अनिल शेटे पा. एका पायाने अपंग असून
प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेत काम करुन व थोडी शेती करुन कुटुंबाची उपजिविका भागवितात
चार महिन्यांपूर्वी अनिल शेटे पा.यांना मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष साहयता निधीमधून तीनचाकी व्हिलचर सायकल मिळाली होती.
त्यांना स्कुटी असल्याने ती व्हिलचर सायकल घरीच बसून दिसत होती
ती व्हिलचर कोणत्याही दिव्यांग बांधवाच्या उपयोगी आले पाहिजे यासाठी अनिल पाटील शेटे यांनी मुदखेड शहरातील मनोज वटृमवार हा दिव्यांग बांधव एक छोटीशी दुकान चालवतात आणि आपली उपजीविका भागवतात.
त्यांना मार्केट मध्ये जाऊन किराणा माल खरेदी करण्यासाठी जवळपास खुप मेहनत घ्यावी लागते.
हे त्यांच्या लक्षात आल्याने
अनिल शेटे पा.व केशरताई शिंदे पा.प्रहार जिल्हा प्रमुख विठ्ठलरावजी मंगनाळे सर यांची भेट घेऊन दिव्यांग मनोज वटृमवार यांच्या विषयी माहिती जाणून घेतली.
कौटुबिंग परिस्थिती हल्लाकीची असल्याने किराणा दुकान चालवून आपली उपजीविका भागवतात दिवसाला १०० ते १५० रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती घेऊन ती व्हिलचर अनिल शेटे पाटिल यांनी मनोज वट्टमवार या दिव्यांग बांधवाला एक छोटीशी भेट म्हणून दिली.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













