नांदेड दि.९ डिसेंबर: आज दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी मा जिल्हाधिकारी नांदेड श्री राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ , तहसीलदार श्री संजय वारकड नायब तहसीलदार श्री सुनील माचेवाड मंडळ अधिकारी श्री कुणाल जगताप श्री अनिरुद्ध जोंधळे मोहसीन सय्यद ग्राम महसूल अधिकारी श्री मनोज जाधव ,माधव भिसे, श्री श्रीरामे , रमेश गिरी,मनोज सरपे,महेश जोशी, कल्याणकर, सचिन उपरे, मुंगल, गजानन होळगे, संजय खेडकर, महसूल सेवक श्री बालाजी सोनटक्के शिवा तेलंगे, जानोळे, हिंगोले महसूल पथक यांनी कल्लाळ, पिंपळगाव निमजी परिसरामध्ये पहाटे 5.00 वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असताना रेती उत्खनन करणारे तीन गुडगुडी, 1 इंजिन आढळून आले. पथकाने मजुरांच्या साह्याने 3 गुडगुडी व 1 इंजिन जिलेटीने स्फोट करून नष्ट केले. 15 तराफे जाळून नष्ट करण्यात आले. असे एकूण 18 लाख किमतीचा मुद्देमाल जाग्यावरच स्फोट करून नष्ट करण्यात आला .पिंपळगाव निमजी येथे अवैध वाळू उत्खनन पॉईंटवर अधिकारी कर्मचारी यांना येऊन आपले साहित्य जप्त होऊ नये म्हणून अवैध वाळू उत्खनन वाल्यांनी रस्त्यावर पाणी सोडून दिले त्यामुळे पायी व साध्या वाहनाने त्या ठिकाणी जाता येत नव्हते परंतु त्यातूनही पथकांनी ट्रॅक्टर मध्ये प्रवास करून त्या पॉईंटवर पोहोचले व साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले.
अवैध उत्खननासंदर्भात नांदेड महसूल प्रशासन सक्तीने कारवाई करेल असा इशारा नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!












