
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !
दि : ०९/०१/२०२४
विशेष पथकांकडून अवैध दारू विक्री करणारे हॉटेल चालक व जुगार अड्यावर धाड टाकून 7,40,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वेरूळ जवळील शार्दुलवाडी परिसरात जुगाराच्या अड्यावर छापा टाकला तर वैजापूर तालुक्यातील मनूर येथील हॉटेल पवन मराठा येथे छापा टाकून अवैध दारू विक्रीप्रकरणी कारवाई केली.
ग्रामीण भागात विशेष पथक हे अवैध धंद्यावर कारवाई करत आहे. जिल्हयात गस्त घालत असतांना विशेष पथक प्रमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की, वेरूळ जवळील शार्दुलवाडी परिसरात काही जण हे शेतात पत्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पथकांने दिनांक 09/01/2024 रोजी रात्री 00: 15 वाजेच्या सुमारास छुप्या पध्दतीने शार्दुलवाडी येथील अमजत बिसमिल्ला खान यांच्या शेतात पाहणी व पडताणी केली असता तेथे काही अतंरावर दुचाकी, अॅटो रिक्षा अशी वाहने पार्किक केलेली दिसून आली. तसेच शेतातील बंद खोलीच्या बाजुला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली छोट्या लाईटच्या उजेडात काही जण हे पैशावर पत्याचे सहय्याने जुगार खेळताना दिसून आले. यावरुन पथकाने अचानक घेराव टाकून छापा टाकला.
पोलिसांच्या अचानकच्या कारवाईने जुगारी लोकांची धांदल उडाली व यातील काही जण हे मिळेल त्या रस्त्याने अंधाराचा फायद्या घेवून सैरावैर पळत सुटले. पथकातील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. या संपूर्ण कारवाईत ८ जुगार खेळणार्यांना ताब्यात घेण्यात आले. १) शेख करीम शेख गणी वय ३८ वर्षे रा. वेरूळ ता. खुलताबाद २) आसिफ ताहेर खान वय ४७ वर्षे रा. खुलताबाद ३) हमीद अलीमुद्दीन शेख वय ४० वर्षे रा. कसाबखेडा ता. खुलताबाद ५) शेख जाकेर शेख वजीर वय ३८ वर्षे रा. सोनखेडा ता. खुलताबाद ६) आकाश शंकर शिंदे वय २५ वर्षे रा. कसावखेडा ता. खुलताबाद ७) सईद अब्दुल सत्तार वय २९ वर्षे रा. वेरुळ ८) हमीद इब्राहिम शेख वय ५३ वर्षे रा. खुलताबाद हे मिळून आले आहेत.
या कारवाई मध्ये रोख 25830/- रुपयांसह दुचाकी वाहने, तीन चाकी अॅटो रिक्षा, मोबाईल फोन, पत्त्याचे कॅट, इतर जुगाराचे साहित्य असे एकूण 701830/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीविरुध्द पोलीस ठाणे खुलताबाद येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस ठाणे खुलताबाद हे करित आहेत.
मनूरमधील हॉटेलवर पोलिसांची रेड- याचप्रमाणे विशेष पथकाला माहिती मिळाली की, पोलीस ठाणे शिवूर हथीतील मनूर येथील हॉटेल पवन मराठा येथे मोठ्या प्रमाणावर चोरट्या मार्गाने अवैधरित्या ग्राहकांना देशी विदेशी दारुची सर्रास विक्री होत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने मनुर येथे दिनांक 09/01/2024 रोजी सकाळी 06:30 वाजेला मिळालेल्या माहितीच्या हॉटेल पवन मराठा परिसरात सापळा लावला. यावेळी सदर हॉटेलमध्ये संशयित हालचाल दिसून आल्यानंतर पथकाने अचानक छापा मारला असता हॉटेल चालक विठ्ठल बारकू दवंगे यांने हॉटेल परिसरता देशी व विदेशी दारूच्या 180 मिली व 90 मिली च्या सुमारे 665 बॉटल ज्यांची किंमत 37,800/- रुपयांचा लपवून ठेवलेला मिळून आला आहे. अवैध विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेल्या सर्व दारू बॉटल जप्त करण्यात आल्या असून हॉटेल चालक विठ्ठल बारकू दवंगे वय ५५ वर्षे रा. मनुर ता. वैजापूर याच्या विरुध्द पोलीस ठाणे शिवूर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाणे शिवूर करीत आहे.
पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील अवैध धंदे बेकायदेशीरपणे चालणारे जिल्हयातील ढाबे व हॉटेलवर देशी /विदेशी दारू विक्री, जुगारांविरुध्द सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. हॉटेल चालकाविरुध्द छापे मारून गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
सत्यप्रभा न्यूज












**mitolyn reviews**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.