
हिमायतनगर प्रतिनिधी/- देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी दि 9 जून रोज रविवारी सायंकाळी राष्ट्रपती भवनात तिसऱ्यांदा शपथ ग्रहण केली. त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हिमायतनगर शहरातील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल यांनी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट समोर एलईडी स्क्रीन द्वारे शहरातील जनतेंना पंतप्रधानाच्या शपथ ग्रहण सोहळ्याचा कार्यक्रम थेट प्रात्यक्षिक दाखवून फटाक्याची आतिषबाजी करून जय श्री राम च्या घोषणा देत सर्वांना साखर वाटत जल्लोष साजरा केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची दि 9 जून रोजी सायंकाळी शपथ घेतली. पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत आलं आहे. त्यामुळे हिमायतनगर भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले श्री परमेश्वर मंदिर समोर एलईडी स्क्रीन लावून ढोल ताशाच्या गजरात फटाक्याचे आतिषबाजी करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथ ग्रहण सोहळ्याचे थेट प्रात्यक्षिक हिमायतनगर शहरातील जनतेला दाखवत फटाक्यांची आतिषबाजी करून ‘दिवाळी’ साजरी केली यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कल्याण ठाकूर, दुर्गेश मंजोडवार, तालुका उपाध्यक्ष रुपेश नाईक, शहराध्यक्ष विपुल दंडेवाड, खंडू चव्हाण, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष लक्ष्मण डांगे शितल सेवनकर, शिवसेना युतीचे शहराध्यक्ष गजानन हारडपकर ,ओमकार चरलेवार, प्रमोद भुसावळे, विशाल अंनगुलवार, योगेश अंनगुलवार, नितीन मुधोळकर, श्रीकांत घुंगरे सह भाजप/शिवसेना शिंदे गट महायुतीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष व्यक्त करून यावेळी आनंद उत्सव साजरा केला