दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.१४ :आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा १२ मे रोजी जन्मदिवस आहे. त्यांच्या स्मरणार्थ व सन्मानार्थ हा दिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. याच औचित्याने धर्माबाद ग्रामीण रुग्णालयात गुरुवार, दि.१२ मे रोजी ‘जागतिक परिचारिका दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वेणुगोपाल पंडित, डॉ. श्याम लखमावार यांच्या हस्ते फ्लोरोन्स नाइटिंगेल परिचारिका यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अगरबत्ती ,मेणबत्ती दिप प्रज्वलन करण्यात आले. इंन्चार्ज सिस्टर शुभांगी सुर्यवंशी,जेष्ठ परिचारिका कल्पना ठाकुर, महामुनी यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डॉक्टरांसह परिचारिकांनी रात्रंदिवस रुग्णांची सेवा करतात. कोणत्याही रुग्णाच्या आरोग्यामध्ये डॉक्टरची जितकी महत्त्वाची भूमिका असते, तितकीच महत्त्वाची भूमिका नर्सची असते. नर्स आजारी व्यक्तींची काळजी घेते. डॉक्टर दिवसभर रुग्णासोबत राहू शकत नाही. नर्स रुग्णाच्या स्थितीवर लक्ष ठेवते. परिचारिकांच्या या सेवाभावाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्यासाठी दरवर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो. जानेवारी 1974 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. मात्र, नंतर मे महिन्यात परिचारिका दिन साजरा केला जाऊ लागला. फ्लॉरेन्स नाइटिंगेलला ‘द लेडी विथ द लॅम्प’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म १२ मे १८२० रोजी इटलीमध्ये झाला. त्यांनी आयुष्यभर रुग्णांची सेवा केली. त्या काळात जगभरात आरोग्याशी संबंधित सुविधांचा तुटवडा होता. विजेचा तुटवडा असल्याने ती हातात कंदील घेऊन रुग्णालयात रुग्णांची सेवा करत होत्या.त्यांच्या परिश्रमामुळे परिचारिकांना समाजात मानाचे स्थान मिळाले. आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेने 1974 मध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. त्या काळात परिचारिकांना किट वाटण्याचे काम आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेकडून करण्यात आले. ते परिचारिकांच्या कामाशी निगडीत गोष्टी पाहत असायचे.अशी माहिती देण्यात आली. या वेळी रुपाली सोनटक्के , जयश्री किनेवाड,प्रिया लोणे, मिना पेदे, शिल्पा माडेवार,जेनिफर वाघमारे, प्रतिक्षा कांबळे, सह नर्सिंग चे शिक्षण घेत असलेल्या मयुरी सोनकांबळे, विद्या कांबळे,संध्याराणी कांबळे, कल्पना वाघमारे, प्रतिभा तांदुलवार, गंगोत्री शेळके, दुर्गा मदनुरे, प्रिती सोनकांबळे, मयुरी सोनकांबळे, अनुसया बोंमले, सह रुग्णालयातील अनेक कर्मचारी उपस्थित होते. तर श्रीमती मनीषा महामुनी यांनी प्रतिज्ञा वाचन केले व उपस्थित सर्वांनी सेवेची प्रतिज्ञा घेतली. इंन्चार्ज च्या वतीने अल्प उपहार , शीतपेय चे आयोजन करण्यात आले होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड