पुणे दि.१८: चिंचवड विधानसभा मतदारंसघातील भाजपमधील गळती थांबायचे नाव घेत नाही. पक्षातील घराणेशाही, मनमानीला कंटाळून वाकडचे वजनदार नेते माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी सोमवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपला राजीनामा पाठविला आणि भाजपला कायमची सोडचिठ्ठी दिली. आता राम वाकडकर यांनी भाजपची साथ सोडल्याचं बोललं जातंय. त्यामुळे रोज एक-एक बडा नेता पक्ष सोडत असल्याने विधानसभा निवडणुकित शहरातील महायुतीच्या तीनही जागांना मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येतेय.
#सत्यप्रभा न्युज #पुणे