नांदेड दि. १२ : रविवारी सायंकाळी झालेल्या मोठ्या पावसानंतर शहरातील अबचलनगर भागात नाल्याचे पाणी पासरु लागल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी भीती व्यक्त केली आहे की सतत पावसामुळे नाल्याला पूर येऊ शकतो. तसेच सेक्टर क्रमांक 18, 19, 14 आणि 15 मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरात नाल्याच्या किंवा पुराचे पाणी शिरु शकते. काही महिन्यांपूर्वी या भागात विकट परिस्थिति उद्भवली होती. महानगर पालिका प्रशासनास त्या वेळची जाणीव असेल.
शहराच्या शक्तिनगर मधून येणारा एक मोठा नाला अबचलनगरला लागून तसेच गोबिंदबाग जवळून वाहत आहे. येथून हा नाला भगतसिंघ रोड येथे पोहचून पुढे शहीदपुरा कडे वळतो आहे. रविवारी सायंकाळी अचानकपणे वातावरण बदल होऊन अवकाळी पाऊस झाले. आज झालेल्या पावसाने हा नाला भरून गेला आहे तसेच यातील पाणी अबचल नगर सेक्टर क्रमांक 18 आणि 19 मध्ये येऊ लागले आहे. पुढे पावसाचा जोर वाढल्यास पूर परिस्थिति निर्माण होऊ शकते असे नागरिकांचे म्हणणे आहे.
अबचल नगर येथील रहिवाशी पत्रकार रविंद्रसिंघ मोदी आणि करणसिंघ बुंगाई यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रशासनास विनंती केली आहे की अबचलनगर भागात पाण्याचा निचरा काढण्यासाठी दूसरे पर्याय उपलब्ध नाही. तेव्हा महानगर पालिका प्रशासनाने वेळीच या विषयाची दक्षता घेऊन समस्याचे निराकरण करावे. पुढे पावसाळा येणार आहे म्हणून मनपा प्रशासनाने उपाययोजना करावी.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड