शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्या आहेत.अशोक खरातसोबत व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे चाकणकरांना राजीनामा द्यायची वेळ आली आहे.
या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला.दरम्यान आता त्यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.
रुपाली चाकणकरांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे.सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुनेत्रा पवारांनी दिली. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
‘रुपाली चाकणकर मॉडेलिंगसाठी उभ्या आहेत असं दिसलं’ राजीनामा देतानाच्या फोटोवरुन दमानियांनी रुपाली चाकणकरांवर टीका केलीय. चाकणकर मॉडेलिंगसाठी उभ्या आहेत असं दिसलं. चाकणकरांवर गुन्हा दाखल व्हावा, तसेच IPS अधिका-याला महिला आयोग अध्यक्ष करा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. ‘निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करा , असे सांगत सुनेत्रा पवारांनी कुठलंही पाऊल उचललं नाही’, असेही दमानिया म्हणाल्या.