तुषार कांबळे !हदगाव प्रतिनिधी!
लाभार्थ्याच्या संचिके मध्ये त्रुटीची पुर्तता करुन सुध्दा नावे त्रुटीत…
हदगांव तहसिल कार्यालय येथील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यातच्या संचिके मध्ये त्रुटीची पुर्तता करुन सुध्दा लाभार्थ्याथच्या संचिकेमध्ये वारंवार नव नविन त्रुटी काढत असल्याने संबंधित सर्व अपात्र व त्रुटीतील नविन निराधार लाभार्थ्यांची संचिका संगांयोची बैठक 15 दिवसाच्या आत घेऊन निराधारांची सर्व संचिका पात्र करुन यादी तात्काळ यादया लावण्यात यावे. अन्यथा 15 दिवसानंतर तहसिल कार्यालय हदगांव समोर सर्व त्रुटीतील व अपात्र लाभार्थी सोबत अमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा दिव्यांग विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष समीर यांनी स्थानिक व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिल्रे आहे.
संजय गांधी निराधार योजनेतील मागील फेब्रुवारी 2024 पासुन लाभार्थ्याचे संचिकेतील त्रुटीची पुर्तता करुन सुध्दा त्या संचिकेमध्ये नव नविन त्रुटी काढुन दिव्यांग व्याक्ती , वयोवृध्द निराधार व विधवा महिलेची गेल्या 1 ते दिड वर्षा पासुन त्यांना त्यांच्या हक्कांच्या योजनेपासुन वंचित ठेवले जात आहे. व तसेच संजय गांधी निराधार फार्म मध्ये तलाठी व मंडळ अधिकारी यांचे चौकशी अहवालात मनाचे निकर्ष टाकुन लाभार्थ्यांची संचिका जाणुन बुजून त्रुटी व अपात्र करीत आहे. संगांयो योजनेतील शासन निर्णय मध्ये चौकशी अहवाला उल्लेख नसुन सुध्दा मनमानी अहवाल निराधार लाभार्थ्यांना मागवत आहे. हदगांव तालुक्याातील संजय गांधी निराधार योजनेची बैठक हि गेल्या अनेक महिन्यापासुन वेळेवर होत नाही. व त्रुटीची पुर्तता केलेल्या संचिका हे पुढील बैठकीत घेतले जात नाही. संगांयोची बैठक प्रत्येक महीन्याला वेळेवर घेणे बंधनकारक आहे. वेळेवर बैठक न घेतल्याने लाभार्थ्यांना विनाकारण मानसिक व शारिररीक आणि आर्थिक नाहक त्रास होत आहे. आणि संगांयोची बैठक झाल्याननंतर पात्र व अपात्र यादी हे किमान 2 ते 3 महिन्या नंतर प्रत्येक वेळा नोटिस बोर्डावर लावण्यात येत आहे.
व तसेच दिव्यांगाच्या दिव्यांग प्रमाणपत्रावर तिन ते पाच वर्षासाठी वैधता कालावधी असलेल्या दिव्यांग व्यक्तींची संचिका जाणुन बुजून अपात्र करीत आहे. त्या दिव्यांगाना त्यांच्या वैधता पर्यंत पात्र करीत नाही. व तसेच संजय गांधी, श्रावण बाळ व इंदिरा गांधी निराधाराच्या संचिकेमध्येत जाणुन बुजून कोणतेही त्रुटी नसताना सुध्दा त्रुटी काढली जाते. संबंधित लाभार्थ्यांना संचिकेतील कागदपत्रे जमा करण्यासाठी व संबंधित अधिकारी व कर्मचा-याच्या सहया व शिक्के घेण्यासाठी खुप धाव पळ, श्रम व पैसे खर्च होत असुन लाभार्याना अर्थिक व मानसिक त्रास होत आहे. परंतु संबंधित अधिकारी व कर्मचारी दिव्यांग व्यक्तीच्या, विधवा महिला, व जेष्ठ नागरीकाच्या संचिका हे जाणुन बुजुन त्रुटी व अपात्र करीत आहे. व तसेच श्रावणबाळ व संजय गांधी आणि इंदिरा गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याना त्यांच्या मोठया मुलाची अट नसल्याने सुध्दा तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मुलाबाबत चौकशी अहवाल मागणी करीत आहे. संजय गांधी,श्रावणबाळ, इंदिरा गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे मुले पालन पोषण करीत नसल्याने व संबंधित लाभार्थ्याचे मुले मोठे किंवा सज्ञान असल्याने श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्याचे एक हि संचिका पात्र करीत नाही. व तसेच हदगांव तालुक्यांतील जास्तीस जास्त संचिकेमध्ये कोणतीही त्रुटी नसुन सुध्दा सर्व संचिकेत कोणतीही मनमानी बनवाट त्रुटीत व अपात्र करीत आहे. हजारो संचिका दाखल असल्यापैकी किमान संगांयो बैठकीत 400 ते 500 संचिके मधुन फक्त 50 ते 60 संचिका मंजुर केले जात आहे. उर्वरीत संचिकेचा पात्र व अपात्र यादी मध्ये सुध्दा नावे नसतात. तर काही लाभार्थ्याचे संचिका संबंधित विभागातुन गहाळ (गायब) होत असते. त्यामुळे निराधार लाभार्थ्यांना वारंवार संचिका करण्यासाठी वेळ,पैसा,श्रम वाया जात आहे. सदर संगांयोच्या बैठकीत तहसिल मध्ये दाखल केलेले सर्व निराधाराची संचिका बैठकीत ठेवले जात नाही. व सर्व संचिका पात्र व अपात्र केल्या जात नाही. व तसेच लाभार्थी एक ते दिड वर्षापासुन त्या संचिका सदर बैठकीत घेत नसल्याने व मार्च आखेर मध्ये लाभार्थीचे उत्पन्नन प्रमाणपत्राची वैधता संपते. संबंधित लाभार्थ्यांनी नविन उत्पन्न काढुन दाखल केल्या्नंतर संबंधित संचिकेत पुढील बैठकीत ठेवले जात नाही. व तसेच त्या संचिकेमध्ये जाणुन बुजून पुन्हात नव नविन त्रुटी काढल्यात जात आहे.
राष्ट्रीय कुंटूंब अर्थ सहाय्य योजनेतील गेल्या 2 ते 3 वर्षा पासुन एक हि लाभार्थ्यांना अर्थ सहाय्य देण्यात आले नाही. आणि नांदेड जिल्हात दिव्यांग विकास संघर्ष समिती कार्यरत असुन सुध्दा संजय गांधी निराधार समिती मध्ये एक हि सदस्य नघेतले नाही. आणि संगांयो बैठक कधी घेणार आहे यांची तारीख सुध्दा दिली जात नाही. आणि हजारो निराधार लाभार्थ्याचे DBT प्रणाली मध्येे ऑन लाईन आधार संल्गन न केल्याने लाभार्थ्याना मासिक अनुदान त्यांचे त्यांना आज पर्यंत मिळत नाही. दिव्यांग व्यक्ती, वयोवृध्द, विधवा महिला हे आपले मासिक अनुदान मिळत नसल्या्ने संबंधित संगांयो विभागात दररोज सतत उन्हात, पावसाच्या पाण्यात चकरा व हेलपाटे मारत आहे. त्यांमुळे निराधारसह त्यांच्या कुंटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्याच्या बैठक हि पंधरा दिवसाच्या आत घेऊन संबंधित सर्व त्रुटीतील व अपात्र आणि नविन निराधारांची संचिका पुढील संगांयो बैठक तात्काळ घेऊन दिव्यांग, विधवा, वयोवृध्द लाभार्थीची संचिका पात्र करुन तात्काळ पात्र यादया लावण्यात यावे. अन्यथा 15 दिवसानंतर तहसिल कार्यालय हदगांव समोर सर्व त्रुटीतील व अपात्र लाभार्थी सोबत अमरण उपोषण करण्यात येईल. असा ईशारा दिव्यांय विकास संषर्घ समितीचे अध्यक्ष समीर पटेल यांनी दिला आहे. त्यांच्या सोबत जमीर पटेल, अजिंक्य अशोक चव्हाण, कुबेर राठोड, शेख कलीम, गजानन शिंगणे, निहाल पटेल, सलीम सरवरी, दिपक सुर्यवंशी, अहेमद भाई, फारुख कुरेशी, मारोती लांडगे, शेख साजीत, रमेश गोडबोल, शेख नासेर,शेख सलीम, दिनेश बाभळे, शबाना शेख, सलमा शेख, धुरपत सुर्यवंशी आदीसह यावेळी हजर होते….

##सत्यप्रभा न्यूज नांदेड##