गेल्या २ वर्षापेक्षा जास्त काळापासून रस्त्याचे काम संथगतीने सुरू खड्डयांमुळे अपघातांना निमंत्रण
नांदेड दि.२७ :शहरासाठी भविष्यातील एक महत्वपूर्ण रस्ता असलेल्या सांगवी आसना ते तरोडा बु. बायपास या रस्त्याचे कामकाज मागील दोन-अडीच वर्षापूर्वी सुरू झाल्याने याभागातीन नव्याने रहीवाशी झालेल्यांना मोठा दिलासा मिळाला होता कारण एकाच वेळी सेंट्रल ड्रेनेज लाईन व सिमेंट रोड सोबतच नाल्या असे काम सुरू होऊन ते पूर्णत्वास जात असल्याचे चित्र दिसून येत होते परंतु गेल्या २ वर्षापेक्षाही जास्त काळापासून रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून खड्डयांमुळे अपघातांना निमंत्रण होत आहे
उत्तर विधानसभा मतदार संघाचे आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या प्रयत्नातून आणि दूरदृष्टीतून त्यांनी या रस्त्यासाठी मोठा निधी मंजूर करून आणत या भागाचा भविष्यकाळातील शाश्वत विकासासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या आसना बायपास रस्त्याची निमिर्तीस मूर्त स्वरूप देत याभागातील नव्याने विकसित होणाऱ्या वसाहतींतील रहीवाशांच्या आशा पल्लवित केल्या होत्या परंतु मागील दोन-अडीच वर्षापूर्वी सुरू झालेल्या या रस्त्याचे काम काही ना काही कारणास्तव संथगतीने होत राहीले व पूर्ण होता होता हा रस्ता अपूर्णच राहून गेला असल्याने या भागातील रहीवाशांच्या आशेवर पाणी फेरले आहे
एकंदरीत या भागातील एक मोठा वर्ग हा आ.कल्याणकरांना माननारा असून त्यांनी केलेल्या विकास कामांवर येथील जनेतेनेही त्यांना साथ देत दाद दिली आहे त्याबळावरच राहीलेला अपूर्ण रस्ता आ.कल्याणकर हे जातीने लक्ष देत पूर्णत्वास नेतील अशी आशा या भागातील रहीवाशी व्यक्त करतांना दिसून येत आहेत ..
आ.कल्याणकरांनी लक्ष घालावे अशी मागणी
सांगवी आसना ते मल्हार चौक बायपास हा आ. कल्याणकर यांच्या पुढाकारातून आकारास आलेला एक महत्वपूर्ण रस्ता आहे व रखडलेले रस्त्याचे काम ते पुन्हा एकदा स्वतः लक्ष घालून पूर्णत्वास नेतील अशी अपेक्षा आहे तसेच अपूर्ण रस्त्यामुळे होणारे अपघात टळतील तरी आ.कल्याणकरांनी या भागातील जनतेचा महत्वाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी होत आहे.
तुळशीदास कोकाटे , सांगवी बायपास, नांदेड
#सत्यप्रभा न्युज #नांदेड