तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथील सावित्रीबाई फुले विदयालयाच्या विद्यार्थ्यांनी शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/ मार्च -2025 परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
एकूण 41परीक्षार्थी पैकी 39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेचा शेकडा निकाल 95.12% लागला आहे. यामध्ये,अनुक्रमे सर्वप्रथम आकाश आडे -81.60% द्वितीय श्रीकृष्ण सुंदर आडे -79.80% तृतीय आलेली कु. ताई राठोड हिने 76.00% तर चतुर्थ आलेला प्रधान संघर्ष – 75.40% गुण संपादन करून शाळेच्या उज्वल यशाचा सातत्यपूर्ण आलेख कायम राखला.

शाळेचे संस्थाचालक राहुलदादा प्रधान यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तसेच सर्वच शिक्षक वृंदांनी परिश्रमपूर्वक अध्यापन करून गुणवत्ता वृद्धीसाठी यथायोग्य प्रयत्न केले. मु.अ.व सर्व शिक्षकांनी आणि संचालक मंडळाने गुणवंत विदयार्थी व विद्यार्थिनींचे तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील भावी यशस्वी कारकीर्द तथा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
##सत्यप्रभा न्यूज नांदेड##