
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- शहरा सह तालुक्यात शिवसेनानेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 9 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या पंधरवाड्या निमित्त शहरात शिवसेनेची पक्ष सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार आहे त्याच बरोबर शहरातील प्रत्येक वार्डात शाखा स्थापन करत शिव संपर्क अभियान प्रत्येक मतदारांच्या घरा घरा पर्यंत पोहोचण्यासाठी या महसूल पंधरवड्यामध्ये हिमायतनगर शहरातील जास्तीत जास्त शिवसैनिकांनी काम करून शिवसेनेच्या सदस्य नोंदविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यासाठी काम करावे असे मा नामदार हेमंतभाऊ पाटील साहेब यांच्या सुचनेने करण्यात आले आहे प्रमुख मार्गदर्शक मा आमदार बाबुरावजी कदम साहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे यांच्या आदेशानुसार आज दि 8 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला शहरातील कनकेश्वर तलाव येथे घेण्यात आलेल्या शिवसेनिकांच्या बैठकीमध्ये शहराध्यक्ष गजानन हारडपकर यांनी सांगितले आहे

या बैठकीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली दि 8 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या बैठीला मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ शिवसैनिक विलास वानखेडे, अनिल भोरे, राम नरवाडे, मसूद भाई हे होते यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शहर प्रमुख गजानन हारडपकर यांनी असे सांगितले की शहरा सह तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या सदस्य नोंदणी अभियानात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून हे शिव संपर्क अभियान घराघरापर्यंत पोहोचवा असे आव्हान केले यावेळी शिवसेना उप शहर प्रमुख संतोष नरवाडे , संतोष मुदेवाड आस्तिक कदम दत्ता देवकते नितीन गडगेराव विशाल स्वामी बाळू जाधव व्यंकटेश गुडेटवार राम जाधव नरेश शिंदे गणेश ताटीकुंडलवर अविनाश टेकेवाड, शितु गायकवाड ,शेख मोशीन, राहुल बनसोडे ,अब्दूल जब्बार सह शाखा प्रमुख, बूथ प्रमुख व शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते














Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.