पुणे दि.२ सप्टेंबर : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर एस.पी. कॉलेजचे विद्यार्थी सोहन निकम आणि केतन शिंदे यांनी “Cyber Shiksha for Cyber Suraksha” या उपक्रमांतर्गत जनता वसाहतीत सायबर सुरक्षा जनजागृती सत्र आयोजित केले. या उपक्रमाला क्विक हील फाउंडेशनचे सहकार्य लाभले.
सत्रामध्ये नागरिकांना दैनंदिन जीवनात मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. फसवे कॉल, फिशिंग मेसेजेस, बोगस लिंक व बँकिंग फसवणुकीपासून कसे सावध राहावे याचे प्रत्यक्ष उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले गेले. तसेच सोशल मीडियावरील प्रायव्हसी सेटिंग्ज, अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारणे, मजबूत पासवर्ड ठेवणे, ऑनलाइन व्यवहार करताना दक्षता घेणे अशा टिप्स नागरिकांना सांगण्यात आल्या.सव्या कॉल्स आणि बोगस मेसेजेसपासून सावधगिरी.फिशिंग आणि बनावट लिंकचे जाळे
आजच्या काळातील सर्वात मोठा सायबर धोका म्हणजे फिशिंग. यात नागरिकांना बनावट ई-मेल किंवा मेसेज पाठवला जातो आणि तो एखाद्या बँकेच्या अथवा सरकारी पोर्टलच्या नावाने असतो. या लिंकवर क्लिक केल्यावर मोबाईलमधील डेटा चोरला जातो. केतन शिंदे यांनी याबाबत सांगितले,
नागरिकांना मोबाईलवर वारंवार बँकेचे बनावट कॉल येतात. “तुमचे KYC अपडेट करा”, “खाते बंद होईल”, “लॉटरी लागली आहे” असे मेसेजेस येतात. लोक भीतीपोटी किंवा लालसेपोटी अशा कॉलला बळी पडतात.
महिला व तरुण वर्गाने या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी स्वतःचे अनुभव शेअर करत सायबर फसवणुकीबाबत चिंता व्यक्त केली. या मार्गदर्शनामुळे नागरिक अधिक सजग व आत्मविश्वासपूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले.डिजिटल साक्षरतेचा मुद्दा
फक्त गुन्ह्यांपासून वाचणेच नव्हे तर डिजिटल युगात सक्षमपणे वावरणेही गरजेचे आहे. त्यामुळे सत्रात डिजिटल साक्षरतेबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. ऑनलाइन पेमेंट अॅप्स योग्य प्रकारे कसे वापरावेत, मजबूत पासवर्ड कसा ठेवावा, मोबाईलमध्ये ‘अँटीव्हायरस’चे महत्त्व काय आहे, याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.
क्विक हील फाउंडेशनचे प्रतिनिधींनी सांगितले की, “सायबर सुरक्षा ही फक्त तांत्रिक बाब नाही तर सामाजिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने दक्षता घेतल्यास गुन्हेगार निष्फळ ठरतील.”
या उपक्रमामुळे झोपडपट्टीतील नागरिकांना डिजिटल साक्षरतेबरोबरच ऑनलाइन सुरक्षिततेचे महत्त्व पटले. अशा जनजागृतीमुळे समाजात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.













