नांदेड, दि. ३१ ऑक्टोबर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे शनिवार 1 नोव्हेंबर 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
शनिवार 1 नोव्हेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने दुपारी 4.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. दुपारी 4.30 ते 4.45 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. दुपारी 4.45 ते 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा स्थळ-शासकीय विश्रामगृह नांदेड. दुपारी 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने समस्त आंबेडकरवादी समाज नांदेडच्यावतीने जाहीर नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- कै. शंकरराव चव्हाण सभागृह (स्टेडियम) नांदेड. सायंकाळी 7.45 वा. कै. शंकरराव चव्हाण सभागृह (स्टेडियम) नांदेड येथून वाहनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी मिशन नांदेडकडे प्रयाण. सायं. 8 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी मिशन नांदेड येथे आगमन. सायं. 8 ते 8.30 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी मिशन नांदेड येथील विद्यार्थ्यांसोबत चर्चा. सायं. 8.30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी मिशन नांदेड येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 8.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन. सायं. 8.45 ते 9.15 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव. रात्री 9.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
00000
 
			














 
 
 
 
 
