तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकाराने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाषराव वानखेडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, तर अध्यक्षस्थान कृषी उत्पन्न बाजार समिती, हदगावचे संचालक गंगाधर पाटील चाभरेकर यांनी भूषविले.
या शिबिरात एकूण २७५३ नागरिकांची तपासणी (OPD) करण्यात आली असून, त्यापैकी ४५० रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा गावाच्या पातळीवरच उपलब्ध झाल्या. शिबिराच्या यशस्वीतेसाठी दत्ता मेघे संस्था व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) येथील डॉ. शिंगारे (PRO), मुरलीधर उमाटे, तसेच सर्व तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमात विकास पाटील देवसरकर, डॉ. विवेक पाटील कोहळीकर, शिवराज पाटील कोहळीकर, युवासेना जिल्हाध्यक्ष संदेश पाटील हडसणीकर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शितल भांगे, हिमायतनगर तालुकाध्यक्ष रामभाऊ ठाकरे, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुरमुरे, डॉ. दीपक कदम, डॉ. बोंढरवाड, डॉ. सुलेवाड, डॉ. मोहीणी सुर्यवंशी (प्रा.आरोग्य केंद्र तामसा) आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनात केशव हरण, माधव नारेवाड, सुभाष धरमुरे, संतोष ठमके, झिया बागवान, दिलीप कोथळकर, गजानन कल्याणकर, गजानन आगलावे, संदीप बंडेवार, राजू लामतुरे, प्रदीप तवर, साईनाथ फुलारे, किशोर घंटलवार, सुरेश ठाकरे, धनराज सोनटक्के, ज्ञानेश्वर विभूते, शरद दुगाळे, सुनील चव्हाण, सुरज तवर, तुकाराम तवर, मंचक कदम आदी शिवसैनिक, आरोग्य सेवक व स्थानिक स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या शिबिरामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेचा थेट लाभ मिळाला असून, हा उपक्रम लोकसेवा आणि आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने एक आदर्श उपक्रम ठरला आहे.