देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आज सकाळपासून (Telangana Election Result) येत आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात काट्याची टक्कर दिसून येत आहे. तर दुसरीकडे तेलंगाणा राज्य निर्मितीपासून सत्ता काबीज केलेल्या केसीआर यांच्या बीआरएसला (BRS) धक्का देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. सध्याच्या कलात काँग्रेस (Congress) आघाडीवर दिसत आहे. एक्झिट पोलमधील निष्कर्षानुसार राज्यात काँग्रेसची सत्ता येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या निवडणुकीत स्वतः मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, काँग्रेसचे दिग्गज नेते रेवंथ रेड्डी, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आणि भाजपाचे राजा या उमेदवारांच्या भवितव्याकडे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत भाजप आणि एमआयएम बीआरएसचा खेळ बिघडवू शकतात. तसेच राज्यातील दहा महत्वाच्या जागांचे निकाल काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या ठिकाणी चुरशीची लढत होऊ शकते. या कोणत्या जागा आहेत याची माहिती घेऊ या..
#सत्यप्रभा न्युज #नांदेड #तेलंगणा