मुदखेड दि.२६ : संविधानाने देशाला सदृढ लोकशाही दिली असून संविधान दिन हा स्वातंत्र्य भारतासाठी अत्यंत मोलाचा आहे. मानावाधिकारासह राष्ट्रीय ऐक्य, सामाजिक सलोखा जपण्यासाठी सर्वांनी नेहमी पुढाकार घेणे गरजेचे आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाच्या मूलभूत अधिकारांकरिता देशाला ऐतिहासिक असा पायाभूत कायदा दिला आहे. संविधानाची मूल्ये रुजविणे आपले प्रथम कर्तव्य असावे, त्यामुळेच या दिनाचा उद्देश्य साध्य होईल असे प्रतिपादन येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी संविधान दिनानिमित्त येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलतांंना केले.
यावेळी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महामानवाला अभिवादन करण्यात आले.
दरम्यान, मुंबई येथे झालेल्या २६/११ च्या भ्याड हल्ल्यातील हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रारंभी, पत्रकार संघाचे माजी जिल्हा सहसचिव संजय कोलते यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले तर सर्व उपस्थितांकडून शपथ घेण्यात आली. यावेळी पत्रकार प्रल्हाद मस्के ,माजी नगरसेवक कैलास गोडसे ,माधव पाटील कदम ,संजय आऊलवर, अजगर हुसेन, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सूर्यकांतराव चौदंते यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. आर .कांबळे, पो.हे . कॉ. दिलीप चक्रधर, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौदंते,कुणाल चौधरी,पत्रकार ईश्वर पिन्नलवार ,संपादक हाजी अजगर हुसेन साब ,गंगाधर डांगे, साहेबराव गागलवाड ,धम्मदाता कांबळे , मुदखेड दर्पण संपादन शेख इरफान अब्दुल रजाक, शेख जब्बार, , अतीक अहेमद, साहेबराव हौसरे, नामदेव बिचेवार ,अमोल टेकले ,हाफिस कुरेशी ,माधव गायकवाड, सुभाष चौदंते,अविनाश चौदंते, माजी नगरसेवक रावसाहेब चौदंते,
माजी नगरसेवक चांदु बोकेफोड अविनाश झमकडे, साहेबराव चव्हाण, संजय उर्फ पप्पू सोनटक्के, सचिन चंद्रे महावितरण चे यंत्रचालक जनार्दन लेंडेवाड, मेंडका येथील माजी सरपंच लक्ष्मणराव ईजळकर, उपसरपंच नारायण निखाते मुजीब पठाण, राजरत्न क्षीरसागर, अशोक पाटील मुंगल इजळीकर, आदित्य कोलते, यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पत्रकार संघाचे माजी जिल्हा सहसचिव संजय कोलते यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष सिद्धार्थ चौदंते यांनी मानले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड