नांदेड दि.५: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपोषणे,आंदोलने, मोर्चे काढण्यात आली आहेत.त्याच अनुषंगाने पोखर्णी ता.जि.नांदेड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने विठ्ठलराव शिंदे यांनी दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी पासुन उपोषण सुरू केले आहे आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे.शासन स्तरावरून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटिल यांच्या उपोषणाची दखल घेऊन जानेवारी महिन्यापर्यंत वेळ जरी घेतला असला तरी आम्हाला सरकारवर विश्वास नाही जोवर सरसकट कुनबी प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्ते विठ्ठलराव माणिकराव शिंदे यांनी आज रविवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी आपल्या प्रतिक्रियांद्वारे दिली आहे
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड